श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
हौसेचं फसलेलं गणित...
श्री आशिष बिवलकर ☆
☆
लग्नात कपड्याच्या हौसेला,
पैशाचं मोल कधीच ते नसतं |
कोपलेल्या सूर्यनारायणापुढे,
मात्र हौसेचं गणित मात्र फसतं |
*
रेमंडचा थ्री पीस सूट शिवून,
लग्नात ऐटीत होता मिरवणार |
मुलीकडच्यांची पोशाखात,
नवरदेव म्हणाला जिरवणार |
*
इतकी वर्षे रखडलेला उपवर,
यंदा मात्र नशिबाने लग्न जुळलं |
समोरची पार्टी पैशाने मजबूत,
तिथंच गड्याचं नशीब फळलं |
*
बँडबाजा वरात सनई चौघडा,
हट्टाने मान्य करुन घेतलं मागून |
वैशाखातच चांगला मुहूर्त आहे,
थाटात लग्न बैठकीत गेला सांगून |
*
वैशाख वणव्यात थ्री पीस सोडा,
चड्डी बनियान घालून तो पाटावर |
पाहून लग्न सोहळा वऱ्हाड्यांनी,
यथेच्छ ताव तो मारला ताटावर |
©️ वास्तवरंग
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





