श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मिसिंग लिंक! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मि सिंग लिंकची लिंक

 काल तुटली अतिवृष्टीने 

 गार प्रवास बोगद्यातला 

 थांबला दरड कोसळल्याने

*

सिं हावलोकन करता 

 कालच्या त्या घटनेचे 

 उदघाट्नाची घाई नडली 

 जनसामान्य वदे वाचे

*

ग रज होतीच म्हणा 

 अशा मिसिंग लींकची 

 घाट प्रवासाचा त्रास

 कायमचा टाळण्याची

*

लिं कची खराब हालत 

 काल टळली असती

 जर बोगद्यावर दरडींना

 जाळी बसवली असती

*

क माल नव तंत्रज्ञानाची 

 मिसिंग लिंकमुळे कळली 

 पण काळजी न घेतल्याने

 त्याची त्रुटी उघडी पडली

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted