प्राची अभय जोशी

☆ तूच एक सावळा… ☆ प्राची अभय जोशी ☆

विठ्ठलाचे हे रूप असे सावळे सुंदर…

गळा तुळशीमाळ अन्, कासे पितांबर…

रूप सावळे साजिरे की, भास होतसे कान्हाचा…

दोन्हीं तयाचीच रूपे, वेध घेतसे मनाचा…

 *

मन सावळे नी ही, हा देहही सावळा…

कटीवर हात ठेऊनी, वाही भार विश्वाचा…

 *

भक्त असे हे वेडे, होती तुझ्यात दंग…

मुखावर तुझ्या शोभे, हा कस्तुरीचा गंध…

 *

सावळ्याची मोहिनी, भिनली ध्यानी मनी…

देहात असूनी विदेही, ही संवेदनाच न्यारी…

 *

जो तो घेई अशी, तुझ्या चरणाशी धाव…

पाव आता विठ्ठला, आर्त झाला भाव…

 *

विठ्ठला बा विठ्ठला, धाव पाव आता…

भक्तांच्या मेळ्यामध्ये, तूच एक सावळा…

तूच एक सावळा…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted