श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
जीवघेणी स्पर्धा!
श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
तू मोठ्ठा की मी मोठ्ठा
लागे स्पर्धा खड्ड्यांत
पाहिलं बक्षीस ठेवलं
अजून बळी फुकटात
*
उघड गटार बाजूचं
ऐकत होतं संभाषण
मला पण घ्या स्पर्धेत
मी पण मारले अनेकजण
*
युती होताच दोघांची
एकमताने ठराव केला
एक वॉर्ड ऑफिसरच
परीक्षक म्हणून नेमला
*
किती देणार “मानधन”
त्याने घरून प्रश्न केला,
खाल्ले ते कमी नाहीत कां
एक “दादा” खड्डा उत्तरला
*
देण्याघेण्या वरून दोघांचं
दरवर्षीप्रमाणे बिनसलं
थुकपट्टीच्या कामामुळे
यंदा ही नशिबी मरण आलं
यंदा ही नशिबी मरण आलं
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






