ज्योत्स्ना तानवडे
चित्रकाव्य
– शब्देविण संवादू – ☆ ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
बाळ बोलते आईसंगे
कसे मूक संवादातुनी
भाव समजती आईचे
गोड बोलक्या डोळ्यातुनी
*
स्पर्श बोलती दोघांचेही
एकमेका आनंद होई
जवळीक आईची अशी
बाळाला आश्वासून जाई
*
सुखावते बाळ ऐकुनी
लाडिकसे बोल आईचे
हुंकार देऊनी तिजला
प्रतिसाद गोड बाळाचे
*
माय लेकरांचे हे नाते
शब्दाविना रंगून जाते
काळवेळाचे भान कसे
दोघांनाही आता नुरते ||
☆
© ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







