श्री अशोक ल. देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “आठवणींचे अंकूरई” ☆ श्री अशोक ल. देशपांडे ☆

उन्हाळ्यात आंबे खाऊन कोयी अंगणात फेकण्याची संवय. इथेही अंगण असल्याने या वयात डस्टबीन कडेच जाणारा हात अंगणाकडे वळला असावा. तो ही अभावितपणे.

पावसाळी नक्षत्रांचा पाऊस पडून गेलेला. भूमीतील बीजं अंकुरित होण्याची वेळ झालेली.

पावसाने उघाड दिलेली.

म्हणून अंगणातील चार दोन फुलझाडांकडे कुतूहलाने पाहत असतांना

दृष्टीस पडलेली ही कोय (वरील छाया चित्र) म्हणजे निसर्गदत्त निर्मिती.

हे पाहून मी लगेच तीसरी चौथीचा खेड्यातील लायना बाबू होवून गेलो.

आणि त्या कोयीच्या आतील बाटीची पुंगी / शिट्टी करून ती वाजवित सैरावैरा पळत राहिलो.

आता हे पळणं व ही पुंगी कुणाला समजाऊन सांगायची? वाळल्या बेलफळाचं कोयाड. पेरकुंडाच्या गाड्या. कुरकुंजी. पालवात भाकर बांधून वावरात पळणं. बाभळीच्या शेंगांच्या भिंगऱ्या. एखाद्या झाडावर महूळ दिसलं का झाडावर एंगून (येंगून) माशा डसतात हे माहित असताना ते झाडणं अशा अनेक गोष्टी कुणाला सांगून काही उपयोग नाही.

आपणंच स्मरण रंजनात फेरफटका मारायचा आणि वर्तमान पिढी च्या ते आकलनापलीकडील आहे हे जाणून स्वतः आनंद घ्यायचा.

© श्री अशोक ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted