सुश्री संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ A small step every day… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
“Take a small step every day for self-improvement.”
काल आमची ‘ post ‘ दिवाळी ‘श्रम परिहार’ पार्टी झाली. ताई कडे आम्ही चौघे बहिण भाऊ व आमचे परिवार जे भारतात आहेत, ते सर्व दरवर्षी एकत्र जमतात. साधारण तीन पिढ्या एकत्र असतात. नेहमीप्रमाणेच मस्त मेन्यू असतोच,. त्या पेक्षाही जास्त गम्मत गप्पा टप्प्यांमध्ये येते. नवीन जनरेशनच्या गप्पा माझ्याकरिता नेहमी नवीनच असतात. खूपदा नवीन काही ऐकले तर… हो!! का?? असं का?? बापरे !!! अशीच माझी प्रतिक्रिया असते. ••••
मागच्या पंधरा वर्षांपासून आम्ही दोघे ज्येष्ठच घरात आहोत. नवीन फॅशन, टेक्नॉलॉजी, IT क्षेत्रातील नवीन work culture, नवीन मुलांचे काम / गोष्टी/ त्यांचे टेंशन याबद्दल माहिती कळते, आपले त्यांच्या बद्दल चे मत बदलते. खरं काय ते कळत. सध्या काय ‘ In ‘ आणि काय ‘Out’ आहे. हे तरुण मुलांकडून कळत. आपलंही वय कमी झाल्यासारखे वाटत. बरे असो, ••••
अजयची availability बघूनच आजचे get together ठरले होते. आम्ही अजयची वाट बघतच होतो. अजय आमच्या सगळ्यांत सर्वात लहान. फोनवर बोलणं होतं असतंच, पण प्रत्यक्ष भेट बर्याच दिवसांनी आज होणार होती. त्यांची मजा वेगळीच असते. ••••
अजय एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. बरोबर सपोर्टिंग दोन कंपन्या पण आहेतच. लहान वयात त्याची प्रगती बघून आम्हा सर्वांना त्याचा नेहमीच अभिमान व कौतुक वाटतं. ••••
थोड्याच वेळात अजय अनिता व त्याचा मुलगा अनय, सून अपूर्वा नवीनच घेतलेल्या ‘BMW ‘ मधून आले. •••
अजय बद्दल सांगायचे म्हणजे, ••••
आज त्याचा स्वतः चां बिझनेस आहे. दोन माणसांना घेऊन सुरू केलेल्या बिझनेस मधे आज अनेक लोक काम करतात. किती तरी परिवार चालतात. बिझनेस करणारा हा आमच्या मिडिल क्लास फॉमिलीतला पहिलाच. कोणाचाही ‘guidance ‘नसताना, हातात काही ही ‘भांडवल’ नसताना, लग्न झालेला, पदरात एक मुलगा असताना, स्वतः च्या हिम्मतीवर स्वतः चा बिझनेस सुरू करायचा म्हणजे सोप्पी गोष्ट नाही. तेंव्हा आम्ही सर्वच थोडे अचंबित होतो. काळजीही वाटत होती. निर्णय बरोबर घेतलाय का?? असे विचार ही मनात येत होतेच. परंतु अनिताच्या भरपूर सपोर्ट होता. ••••
आमची अनिता ‘पंजाबी’ आहे (होती) आता पूर्णपणे मराठी आहे. मराठी सून आणली आहे तिने. तिने मात्र पूर्ण सपोर्ट केला. ••••
” आप शुरू करो। मैं हुं ना । मैं परिवार का खर्च संभाल लुंगी। आप अपने काम पर ध्यान दो ।”•••••
इतक्या आत्मविश्वासाने जर कोणी तुमच्या पाठीशी असले तर बळ मिळते. उमेद वाढते. परिस्थितीशी दोन हात करायची हिम्मत येते. •••
” मैं हुं ना । ” खरंच जादुई शब्द आहेत. •••
आपला बिझनेस सुरू करावा, असा विचार मनात येणारे बरेच लोक असतात, पण ते करायला हिम्मत असणे म्हणजे खरंच खूप कौतुकास्पद आहे. ••••
आज आम्ही अजयला एक जिंकलेला बिझनेस मॅन म्हणून बघत असलो, तरी इथं पर्यंत पोचायचा प्रवास अगदी सहज नक्कीच झाला नसेल. किती तरी टक्के टोमणे, उतार चढाव त्याने नक्कीच बघीतले असतील. पैशाचा प्रश्न तर येतच असेल. कधी इच्छा असूनही तारूण्याचे शौक पूर्ण करणे जमले नसेल.. म्हणजे मानसिक, शारिरीक सांपत्तिक अडचणींना तोंड देत, न घाबरता, न डगमगता आपल्या निर्णयावर ठामपणे जगता आले पाहिजे. हे तेंव्हाच शक्य आहे, जेंव्हा घरचे पण इतर सदस्य साथ देतात. ••••
“म्हणजे करायचे ठरविले तर बिझनेस करता येतो हे सिद्ध झाले. ” याकरिता अगदी अंबानी, अडानी कडेच जन्म झाला पाहिजे असे नाही. ••••
‘Self-Employment ‘ कल्पना चांगली आहे. यशस्वी होण्यासाठी प्रचंड कष्ट,, योग्य नियोजन व अपयशातून शिकण्याची व जिंकण्याची जिद्द असावी लागते. हेच यशामागचे रहस्य आहे. ••••
अजय म्हणजे, ••• एक सामान्य घरातील सामान्य मुलगा, पण खूप systematic, disciplined, विचारांची clarity असलेला, खूप विचारपूर्वक planning and execution करणारा. याबरोबरच रोज एका नवीन विचाराने, ••••
“अजून काय करू शकतो?? “कशी सुधारणा होऊ शकते?? ” दिवसाची सुरुवात करणारा •••
पैशाचा वापर, workers, factory ची safety, scrap ची विल्हेवाट कशी लावायची??? रोजचा पैशाचा हिशोब देणे घेणे, याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवणे. यासर्व गोष्टींकडे लक्ष ठेवताना, आपला बिझनेस वाढवायचा ही विचार करणे. उत्पन्न कसं वाढवता येईल?? आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांचा विचार करणे. त्यांना अनुनासित ठेवणे, प्रत्येकाच्या क्षमतेचा maximum उपयोग करून घेणे. वेळप्रसंगी त्यांना मदत करणे, गरज पडल्यास रागविणे. या सर्व गोष्टींचा बॅलन्स ठेवणे. नवीन क्लायेंटस जोडणे, आपल्या फिल्डच्या स्पर्धेत टिकून राहणे, अशी अनेक कामे. •••
या सर्व गोष्टी सांभाळून आपली फॅमिली लाइफ, आपल्या स्वतः साठी वेळ काढणे, स्वतः चे मनोरंजन, व्यायाम, आठवड्यात एक दिवस सुट्टी घेणे. म्हणजे फॅक्टरी व फॅमिली दोन्ही महत्वाचे, त्यात बॅलन्स सांभाळणे, हे वेळेवर समजणे. ही एका बिझनेसमॅनच्या सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. ••••
हे सर्व करताना अनेक गोष्टींचा विचार, त्यांचे systematic व्यवस्थापन, योग्य वेळेस योग्य गोष्टीला वेळ देणे, वेळेवर योग्य निर्णय घेणे. हे जमायला तुमचे स्वतः चे अनुशासन चांगले असावेच लागेल. ••••
म्हणजे खूपदा मला असे वाटते हा माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा मोठा असायला हवा होता, माझी पण प्रगती झाली असती असो, •••••••
आज त्याच्या शी गप्पा मारताना बऱ्याच गोष्टी कळल्या. दहा पंधरा वर्षांत कंपनी ला एका उंचीवर पोहोचविण्याचे रहस्य काय?? मी विचारलं?? ••••
What is basic principle/ base line, you followed in your system/ your work?? ••••
त्याने दिलेले उत्तर. •••••
तो म्हणाला, हे सर्व करताना मी एकच नियम पाळला. ••••••
Take small step every day. प्रत्येक दिवशी नवीन विचार / कल्पना /improvement यांचा विचार करायचा व ते अमलात आणायचे. थोडक्यात स्वतः शीच रोज स्पर्धा करायची. ••••
म्हणतात ना, •••••
” न्युनतम से शुरू करो, सरलतम का अभ्यास करो ।•••
Start with the smallest, practice the easiest. ••••
Just do that, You will find tremendous difference in your achievements / personality. ••••
अजय पुढे म्हणाला, ••••
आपले मन कोणताही छोटा चेंज करायला सहज तयार होते. जसे, ••••
आपल्याला हात वर करा म्हंटल तर आपण करतो, अजून वर करा म्हंटल तर पुन्हा वर करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपल्यात अजून क्षमता असते. म्हणजेच maximum possible extent पर्यंत पोहचायला आपली क्षमता दररोज वाढवायची असते. ••••
एकदम मोठा चेंज / काम करायला आपले मन सहज तयार होत नाही. आपल्याला जमेल का?? बहुतेक नाही जमणार असेच विचार जास्त येतात. ••••
हा नियम आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात लागू पडतो मग तो अभ्यास असो, स्वयंपाक करणे असो, एखादी कला शिकणे असो नाही तर स्वभावात बदल करणे असो. ••••
आयुष्याच्या प्रगतीचा अगदी सरळ सोप्पा साधा उपाय, जो कोणीही सहज करू शकतो.
” Just Take One Small Step ”
मला आवडला. ••••
आज अजय व नवीन पिढीचा उच्च शिक्षित अनय मिळुन कंपनी चे काम बघतात. अनुभव व नवीन टेक्नॉलॉजी/ energy चां positive प्रभाव दिसतोय. ••••
म्हणतात ना, ••••
“एक शांत अनुशासित मन चुनौतियों के खिलाफ एक प्रभावी हथियार होता हैं।
परेशानी में जो अनुभव सीख मिलती है उससे जीवन समृद्ध होता है. “।••••
© सुश्री संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





