सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “छेडोगे तो छोडेंगे नहीं…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

*कधी कधी शक्ति प्रदर्शन करणं आवश्यक असतं. * 

– – आज कुठून सूर्य उगवला माहित नाही. रोज शांतपणे सुरू होणारा दिवस, आज जरा विचित्रच सुरू झाला. रात्रभर अस्वथच होते मी. स्वप्न पण विचित्रच पडली. सारखी मारामारी दिसत होती. द्रोण, मिसाइल, सायरन किती ते आवाज! डोक भणभणत होत. रोज सकाळी देवाला नमस्कार करत आणि आजची सकाळ बघायला मिळाली, त्याबद्दल देवाचे आभार मानत, भूमीला वंदन करत उठणारी मी, आज वर्षानुवर्ष चालणारी परिपाटी पार विसरून गेले.

मन अस्वस्थ, अशांत, काहीतरी बिघडलंय, काहीतरी वेगळ घडलय, जे मन विचलित करणारं, तसं काहीतरी वेगळंच.

 भांडण, मारामारी, ठोकाठोकी आज स्वप्नात हेच सगळे बघितले. आणि TV वर पण जोरजोरात तेच सांगणं चालू होतं.

आज काही खरं नाही. विचाराची दिशा चुकलीच आहे. आज त्याच संदर्भात जुन्या घटना आठवल्या.

मनाने एकदम भरारी घेतली. मन तर वाटच बघत असत. सुपरसोनिक स्पीड ने भांडणाच्या सर्व घटना बरोबर शोधून काढल्या. त्यावर बरोबर वार केला.

खरतर भांडाभांडी करायचा माझा स्वभाव नाही. पटत नाही अस जेंव्हा कधी माझ्या लक्षात येत, तेंव्हा मी रस्ता बदलते. हा सरळ सोपा मार्ग मी निवडला आहे. पण जेंव्हा हे लक्षात येत की आपल्या शांतिपूर्ण वागण्याला समोरचा granted घेतोय, तो आपल्याला मूर्ख समजतोय. बेवकूफ समजतोय, तेंव्हा मात्र दणका दयावाच लागतो. दणका मात्र वेळ बघून, जोरात बसेल, चार लोकांच्या लक्षात येईल असा देते.

*जोर का झटका जोर सेही लगे* असाच वार करायचा.

या विचारा बरोबर हे जे चाललय, ते चूक की बरोबर याचाही गोंधळ मनात चालूच असतो. त्यांना दणका देताना, आपल पण नुकसान होतच असतं ना.

दणका द्यायचे *दोन* फायदे होतात.

** एकतर आपल्याला आपली शक्ति कळते. वार करताना काय बरोबर? कुठे चूक झाली ? हे कळत. म्हणजे पूढे जर अशी वेळ आलीच, तर जास्त पावरफुल वार करता येईल. लगेच पूढची *strategy* तयार होते.

आणि दुसऱ्यालाही आपण काय आहोत? हे समजत. बाकीचे चार लोक आपल्या आप सावध होतात. त्यांनाही आपल्या शक्तिची झलक दिसते. आपल्याबद्दल त्यांचे अनुमान/ Impression ते ठीकठाक करतात.

उदया पुन्हा खोड्या काढायच्या आधी, पंगा घ्यायच्या आधी सर्व विचार करतील.

त्यामुळे भांडण नेहमी चूकच असत अस नाही. असा आज मी शोध लावलाय.

लहानपणी शिकवल होत *भांडायच नाही. * आता गेले ते दिवस. एका गालावर मारल तर दुसरा गाल पूढे करायचे दिवस गेले.

कधी कधी शक्ति प्रदर्शन करणही आवश्यक असतच. आपण जपून ठेवलेले हथियार वेळ पडली तर काम चोख बजावतात की नाही त्यांची *testng* पण होऊन जाते.

भांडणात फायदा तसा कोणाचाच नसतो. भांडणानंतरही नाॅर्मल व्हायला वेळ लगतोच.

*अरे!! त्यावेळेस मला अस बोलायला हव होत, अस म्हणायला हव होत. अस करायला हव होत. * चर्चांचा दौर सुरू होतो. जो तो आपल्या बुद्धीनुसार, स्वभावानुसार, आपला फायदा बघून आपले विचार मांडत असतो.

हे सर्व मनात येत राहतं. बरेच दिवस त्यावर विचार होत राहतो. हे असं किती दिवस चालेल ? हे माहित नसत. एकदा मनसोक्त ठोकून झालं की लवकरात लवकर भांडण थांबविणं आवश्यक असतं. कधी कधी लोक दुसऱ्यांचा चष्मा घालून त्यांचा आधार घेऊन भांडतात. इंग्रजीत भांडतात. त्यांचा बहुतेक असा समज असतो की अस केल्याने समोरच्यावर जास्त दबाव पडेल. दबाव आणि प्रभावाचा माझ्यावर काडीचाही असर पडत नाही.

भांडताना केव्हा थांबायचे ? ते मात्र वेळेवर कळलच पाहिजे. आपल्या भांडणाची मजा घेणारे कोण ? किती जण आहेत ? आपल्याला उक्सवणारे किती आहेत ? आपल्याला समोर ढकलून मागच्या मागे पळून जाणारे कोण ? किती ? शुभचिंतक किती ? हेही समजत. तसे शुभचिंतकांची संख्या खूप नसतेच. या अशा लोकांच्या तावडीत जायचं नाही.

*There are lot of jealous people with friendly faces around us. We must always remember this truth. * 

त्यांच्या मनोरंजनाचे कारण आपण व्हायच नाही. ते काय फ्री फुकटमध्ये मजा घेतात. नुक़सान तर आपलंही होतंय ना. आपण आपली किती energy, वेळ, पैसा, मनस्वास्थ्य? यावर खर्च करायच, हे आपल्यालाच ठरवायच असत. त्यामुळे वेळेवर, *Cease fire* करणं जमलं पाहिजे.

लोकांना काय वाटेल ते वाटू दे. काही समजो वा न समजो लोक काय दोन्ही बाजूने बोलतात.

*If you want to make wrong decision, ask everyone. * 

*Cease fire* मी घाबरले म्हणून झाला नाही, केलाय.. माझा उद्देश्य पूर्ण झाला होता. म्हणून केलाय. मग पुढे होणारे नुकसान वाचविण्यातच हुशारी होती. एवढं समजण्याइतपत आपण हुशार आहोतच. आपल्याला आपली जबाबदारी, कर्तव्य, माझं, माझ्या कुटुंबाच हित समजण्याएवढी हुशार मी नक्कीच आहे. फुकटच काही मिळतंय म्हणून लाळघोटेपणा करणं जमत नाही मला. हा माझा

* EGO* नाही *SELFRESPECT* आहे.

सकाळी विचलित असलेल मन हळुहळु शांत झाल. जे झाल ते चांगल झाल. आणि लवकर थांबल, तेही चांगलच झाल.

म्हणतात ना,…

* Revenge is just waste of Time, Skip people. *

हे जरी खर असल तरी कधी कधी छान *दणका* देण आवश्यक असतच.

शक्ति प्रदर्शन करण ही आवश्यक आहे.

खूप soft राहिल तर लोक मूर्ख समजतात. तेंव्हा आपली strong personality दाखविणेही आवश्यक असत.

**छेडोगे तो, छोडेंगे नही, थोडा नुकसान सह लेंगे, लेकिन झुकेंगे तो बिल्कुलही नही. **

हा मेसेज देणे आवश्यक असतं…

At the same time…

If you treat me good, I will treat you better. – – हेही सांगणे/ दाखवणे आवश्यक असते.

कोणाला सांभाळायचं ? आणि कोणापासून सांभाळून रहायचं ? हे ही समजलंच पाहिजे. नाही का ?

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments