सौ. मंजुषा सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “गुरू…!!!!!” – लेखक : श्री सलील कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
जी व्यक्ती चालायला शिकवते…
धावायला बळ देते आणि
उगाच धावण्यातला फोलपणा सजवून सांगते….
ते गुरु…!!
काहीही लिहिताना.. गाताना..बोलताना…चित्रपट करताना…
ज्यांचा धाक वाटतो…ह्यांना आवडायलाच हवं…ह्यांना पटायला हवं असं वाटतं..
ते गुरु…!!
काय अनुभवायला हवं आणि कुठे फिरकायचं सुद्धा नाही हे स्वतःच्या अनुभवातून सांगतात
ते गुरु…!!
मी सांगतो तेच करायला हवं… असं न म्हणता..
तू करून पाहा…
मी आहेच पाठीशी.. असं म्हणतात..
ते गुरु…!!
….. चांगल्या गोष्टीची गोडी लावतो तो गुरू…
….. १००% कशाला म्हणायचं… हे शिकवतो तो गुरु…
….. “मीपण” बाजूला ठेवून काहीही अपेक्षा न ठेवता देऊ शकतो
तो गुरु…!!
म्हणजेच…
जो आई होऊ शकतो तो गुरु ……!!
जो बाप होऊ शकतो तो गुरु……!!
☆
लेखक : श्री सलील कुलकर्णी
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





