सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
🎇 ई-अभिव्यक्ति हिन्दी विभागाचे .. “सी मो ल्लं घ न” 🎇
आज आपल्या सर्वांसाठीच एक अतिशय आनंदाची बातमी आहे… ती अशी की…
“Indian Top Blogs” ही देशभरात हिन्दीमध्ये प्रकाशित होणाऱ्या सर्वश्रेष्ठ ब्लॉग्सची डायरेक्टरी आहे जिची १६ वी अद्ययावत केलेली आवृत्ती १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. आणि त्यामध्ये “ई-अभिव्यक्ति हिन्दी” या ब्लॉगचा “श्रेष्ठ हिन्दी ब्लॉग” म्हणून समावेश करण्यात आला आहे. या यादीत एकूण ८० हिन्दी ब्लॉग्सचा समावेश आहे.
आणि ही आनंदाची बातमी कळवणारे पत्र असे …
प्रिय ब्लॉगर मित्र,
हमें यह बताते हुए खुशी हो रही है कि हिन्दी के सर्वश्रेष्ठ ब्लॉगों की डायरेक्टरी के 16वें संस्करण में आपका ब्लॉग सम्मिलित किया गया है। शुभकामनाएं!
अगर आप अपने ब्लॉग पर डायरेक्टरी की लिंक वाला बैज लगाना चाहें तो बैज का कोड डायरेक्टरी के अंत में दिया हुआ है।
डायरेक्टरी का लिंक >> 2026 में हिन्दी के सर्वश्रेष्ठ ब्लॉग | Best Hindi Blogs 2026
सादर,
प्रभाकर
……
आपल्या सर्वांतर्फे आपले संस्थापक – संपादक श्री. हेमंत बावनकर, आणि हिन्दी दैनिकाचे संपादक (हिंदी) श्री. विवेक रंजन श्रीवास्तव यांचे, तसेच या ब्लॉगसाठी उत्तम साहित्य पाठवणारे सर्व साहित्यिक यांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि असंख्य शुभेच्छा.💐
Feedspotनामांकित डायरेक्टरीमध्ये आपल्या मराठी ब्लॉगचा याआधीच समावेश केला गेलेला आहे हे तर आपण जाणतोच. तो आनंद आता द्विगुणीत झाला आहे.
– संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






