सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री प्रणिता खंडकर
💐 अ भि नं द न 💐
नेहेमीच वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभणारे प्रसिद्ध साप्ताहिक – “साप्ताहिक सकाळ“ ने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या ४०व्या वर्धापन दिनानिमित्ताने “ कथा स्पर्धा “ आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी भारतभरातून ३००० पेक्षाही जास्त कथा आलेल्या होत्या हे आवर्जून नमूद करायलाच हवे… आणि सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री प्रणिता खंडकर यांना या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे…
आपल्या सर्वांतर्फे प्रणिताताईंचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि यापुढेही असेच पुरस्कार मिळवणारे उत्तम साहित्य त्यांच्याकडून लिहिले जावे अशा असंख्य हार्दिक शुभेच्छा.
“खोरो भरवानी“ ही त्यांची पुरस्कारप्राप्त कथा येत्या दिवाळी अंकात वाचायला मिळणार आहे.
आज “जीवनरंग“ सदरात वाचूया त्यांचीच एक वेगळी कथा.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



