सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
💐 संपादकीय निवेदन – – “ अभिनंदन “– ‘ काव्यानुभूती ‘ पुस्तकाबद्दल 💐
सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन्स यांच्यातर्फे “काव्यानुभूती” हे पुस्तक दिनांक २७ जुलै २०२५ रोजी पुणे येथे प्रकाशित झाले. हे पुस्तक कादंबरी – कथासंग्रह – लेखसंग्रह किंवा कवितासंग्रह अशा कुठल्याच प्रकारात येत नाही – तर हा आहे दहा कवयित्रींच्या वेगवेगळ्या प्रत्येकी पाच कवितांच्या रसग्रहणाचा संग्रह… एकूण ५० कवितांचे रसग्रहण यात आहे आणि हे रसग्रहण केलेले आहे आपल्या समूहातील पाच ज्येष्ठ लेखिका / कवयित्रींनी.. त्या कवयित्री म्हणजे – – –
** सुश्री ज्योत्स्ना तानवडे
** सुश्री अरुणा मुल्हेरकर
** सुश्री नीलिमा खरे
** सुश्री राधिका भांडारकर
** सुश्री अमिता पाटणकर
या अनोख्या संग्रहाबद्दल वरील सर्व लेखिका / कवयित्री यांचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ‘काव्यानंद ‘ सदरात वाचूयात या संग्रहातील एका कवितेचे रसग्रहण. आणि या पुस्तकाच्या संकल्पनेबद्दल जाणून घेऊ या ‘ पुस्तकावर बोलू काही ‘ या सदरातून.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




