सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री विश्वास देशपांडे – अभिनंदन
संपादकीय निवेदन
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या “आनंदयात्री रवींद्रनाथ” या पुस्तकाला नुकताच तितीक्षा इंटरनॅशनल, पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा – –
“उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आपल्या सर्वांतर्फे श्री विश्वास देशपांडे यांचे मनःपूर्वक खूप अभिनंदन, आणि त्यांच्या यापुढील अशाच दैदीप्यमान साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
आजच्या अंकातील ‘ पुस्तकावर बोलू काही ‘ या सदरात करून घेऊ.. या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा थोडक्यात परिचय.
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




