सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. मंजिरी येडूरकर

💐अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. मंजिरी येडूरकर यांनी तिहेरी यश संपादन केले आहे.

काव्य किरण मंडळ, कल्याण यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धेत त्यांच्या ‘ज्ञानेश्वरांचा वसंत’ या रचनेस तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

ऋतूपर्ण दिवाळी अंक आयोजित कथा स्पर्धेत त्यांच्या कथेला उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्याकडून मराठी साहित्याच्या अभ्यासासाठी घेण्यात येणा-या साहित्यभूषण या परीक्षेत तृतीय कृष्णामाई पुरस्कार प्राप्त झाला आहे.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

आजच्या अंकात वाचू या त्यांची ही विशेष कविता – ज्ञानेश्वरांचा वसंत

 

☆ ज्ञानेश्वरांचा वसंत ☆

 (राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा, काव्य किरण मंडळ, कल्याण)

(विषय – संत ज्ञानेश्वर, शीर्षक – ज्ञानेश्वरांचा वसंत)

दिसतो वसंत, व्यासांच्या तेजाते

महाभारताते, वैभविले

*

अर्जुन वसंत, कृष्ण तो कोकीळ

पार्थास कथील, गीताख्यान

*

वसंत कळतो, हिरवाईतून

दिव्य तेजातून, जैसा ज्ञानी

*

प्रतिभेच्या वेली, बहरली गाणी

देह रुपी वनी, वसंत हा

*

मी पण लोपेल, स्मरा भगवंत,

भक्तीचा वसंत, गीताख्यान

*

वसंती सुमने, सुमनी शैलेय

श्रीकृष्णी अजेय, गीतार्थात

*

कर्म फल त्यागी, वसंत मोहवी

म्हणे त्या माधवी, ज्ञानदेव

*

वसंती मोगरी, ओवली वा सुटी

समानत्व वाटी, गंधामाजी

*

तैसे साम्य दावी, गीतेची संस्कृत,

टीका ती विस्तृत, मराठीत

*

अशा या वसंता, किती रूपातून

पाहतो आतून, ज्ञानदेव

सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted