सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
डॉ. भारती माटे
💐 अ भि नं द न !! 💐 हार्दिक अभिनंदन !!!💐
आपल्या ई-अभिव्यक्ती साहित्य मंचातर्फे आपण गेली चार वर्षे अतिशय देखणा असा दिवाळी विशेषांक प्रकाशित करतो आहोत. हे देखणेपण अंकाच्या मुखपृष्ठापासूनच वाचकांचे लक्ष वेधून घेते. या अंकांचे फार सुंदर आणि देखणे मुखपृष्ठ आपल्याला तयार करून देणाऱ्या चित्रकार सुश्री डॉ. भारती माटे यांचे आपल्या सर्वांतर्फे खास अभिनंदन करण्यासाठी आजचे हे खास संपादकीय…
नुकताच डॉ. भारतीताई यांना “The Art Avenue International Brooklyn Galleria Excellence Award 2026 in the category of Paintings! “ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं आहे.
या संस्थेविषयी आणि पुरस्काराविषयी अगदी थोडक्यात सांगायचे तर – –
Art Avenue is the leading International Art Competition & Exhibition in INDIA I UK & INTERNATIONAL ARTIST’S International Brooklyn Award by Art Avenue is an independent Art Center of Excellence that offers a platform for everyone to create, collaborate and reflect upon social issues & others through the arts.
या निमित्ताने डॉ. भारती माटे यांच्या इथपर्यंतच्या यशस्वी वाटचालीबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.
डॉ.भारती माटे – – स्टेट बँकेत ३३ वर्ष नोकरी आणि बँकेत असतानाच छंद म्हणून जोपासायला सुरुवात केलेल्या चित्रांचं पुढे व्यवसायात रूपांतर करण्यात त्यांनी सुयश मिळवलेले आहे.. आत्तापर्यंत तीन आर्ट रिसर्च प्रोजेक्ट केले – – –
पहिला प्रोजेक्ट :
मध्यप्रदेशातील भीमबेटक्याच्या गुफांमधील, सात कालखंडातील काढलेल्या चित्रशैली आणि चित्रांचा प्रवास. साधारणपणे ४००००-१००००० वर्षांपूर्वीची शिलाचित्रे, आणि त्याचे विशेष म्हणजे रंगीत चित्रे, (pigmented Rock art) ह्यावर संशोधनात्मक लेखन व चित्र निर्मिती.
दुसरा प्रोजेक्ट :
सिंधू संस्कृतीतील कलाविष्कार – – त्यांनी साधारणपणे दहा ते बारा वर्षे ह्या प्रोजेक्टवर काम केलं. त्याच्यातून आठ ते दहा एकल चित्र प्रदर्शने, 15 ते 20 ग्रुप शो, आणि हा प्रोजेक्ट लोकाभिमुख करण्याच्या दृष्टिकोनातून भेटपत्रे, चित्रे, चित्र प्रदर्शने, डायरी, कॅलेंडर अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
प्रोजेक्ट तिसरा :
ड्रायफ्रेस्कोज् ऑफ रंगावली ऑन कॅनव्हास.. .. .. त्यांनी जमिनीवर असणारी रांगोळी ड्रायफ्रेस्को पद्धतीने कॅनव्हासवर आणली. जमिनीवर असलेल्या रांगोळीला उभं करण्यात त्यांना यश प्राप्त करता आलं आहे . आपल्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे त्यांनी याच पद्धतीने चितारलेली आहेत. विशेष म्हणजे याच कलाविष्काराबद्दल Irvine, USA या अमेरिकन विद्यापीठाने त्यांना पी.एच.डी. प्रदान केलेली आहे.
.. .. .. आजपर्यंत त्यांना दोन इंटरनॅशनल, तीन नॅशनल आणि पाच स्टेट अवॉर्ड्स मिळाली आहेत. त्याच्यात भर म्हणून आता नुकताच आर्ट अवेन्यू ब्रुकलीन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन फॉर पेंटिंग अँड फोटोग्राफीमध्ये 2026 चे ‘एक्सलन्स अवॉर्ड 2026′ त्यांना मिळालेले आहे.
नुकत्याच मिळालेल्या या सुप्रतिष्ठित पुरस्काराबद्दल त्या सांगतात..
.. ..” या सदर प्रदर्शनात मी व माझे सहचित्रकार सुनील बलकवडे आम्ही दोघांनी वैयक्तिक सहभाग घेतला होता. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्‘, या विषयावरील सात चित्रांच्या मालिकेला हे बक्षीस मिळालं.
.. .. .. भारतामध्ये साधारणपणे साडेसहाशे लोककला आहेत.. रांगोळी ही त्यापैकीच एक. त्यातल्या अनेक कला आता संपत चाललेल्या आहेत. अशा वेळेला तिला काय करून जपता येईल अशा प्रयत्नांमधून ही फ्रेस्को चित्रशैली जन्माला आली, त्याच्यावर आम्ही साधारणपणे दहा ते बारा वर्षे काम केलं आणि आता हे कॅनव्हास आपण जगभर कुठेही पाठवू शकतो इतकी सिद्धता आता प्राप्त झालेली आहे. आपण स्वतःच एक प्रोजेक्ट घेऊन ‘रांगोळी’ ही संपत असणारी कला कशी सांभाळून ठेवू शकू ? या विचारातून या प्रोजेक्टला सुरुवात झाली.
.. .. .. भारतीय चित्रकलेत रांगोळीचा चेहरा हा मुळातच प्रतीकात्मक आहे आणि प्रतिकात्मक रांगोळी मधील रेषा ही त्यांची चैतन्य केंद्रे आहेत.
.. .. .. भारतीय कला विश्वात आपल्याकडे मुळामध्ये वेद आणि उपनिषदिक वाड्गमय हे अपौरुषेय आहे, परम आध्यात्मिक वैभव आहे .. इतके की त्यातील शब्द, श्लोक, सुभाषिते असतील, मंत्र जप असतील, बिजाक्षर असतील किंवा काही चांगली वाक्यं असतील, तर अशा सगळ्या ‘ स्क्रिपचर्स ‘ माध्यमातून ती आपल्यापर्यन्त पोचतात, कारण ही स्क्रिपचर्स म्हणजे थॉट फॉर्मस् आहेत, आणि हे थॉट फॉर्मस् आपल्याला चित्रांमध्ये परिवर्तित करता येतात हे जेव्हा मला कळलं, तेव्हा काम करताना खूप मजा यायला लागली, आणि त्यामुळे या चित्रमालिकेमध्ये सुद्धा आपण वेदांनी उदघोषित केलेल्या वाक्यातून प्रेरणा घेऊन ‘वसुधैव कुटुंबकम्‘, चा विचार प्रत्येक वैयक्तिक चित्रातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे . नमुन्यादाखल सदर मालिकेतील एक चित्र सोबत जोडले आहे…ज्याचे शीर्षक आहे..
‘Save Nature, A Sacred Duty’.
(कृपया enlarge करून पहावे).

या पुरस्कारप्राप्त चित्राबद्दल मी इतकेच सांगेन की –
“Our series of seven paintings on Vasudhaiva Kutumbakam—born from the sacred light of Prime Minister Narendra Modiji’s 75th birthday—has touched souls across oceans.
This isn’t mere award—it’s affirmation that art bridges hearts, just as Modiji’s vision, unites Bharat with the world… From Pune’s studios to Brooklyn’s galleries!! “
– भारती माटे.
*****
इतका व्यापक आणि अत्यंत मोलाचा विचार आपल्या कलेच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याचा भारतीताईंचा हा यशस्वी प्रयत्न खरोखरच अपवादात्मक आणि अत्यंत गौरवास्पद आहे.
– – आपल्या सर्वांतर्फे सुश्री डॉ.भारती माटे यांचे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन आणि या आगळ्या वेगळ्या वाटेवरचा त्यांचा यापुढील प्रवासही असाच यशस्वीपणे सातत्याने चालू रहावा यासाठी त्यांना असंख्य हार्दिक शुभेच्छा.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







भारतीताईंचं खूप खूप अभिनंदन 🪷🪷