image_print

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है आपकी एक समसामयिक विषय पर  एक शिक्षाप्रद आलेख  “कोरोना व्हायरसमुळे देशभरात होणारे स्थलांतर,त्याचा वाढता धोका आणि आपली जबाबदारी।)

☆ कोरोना व्हायरसमुळे देशभरात होणारे स्थलांतर,त्याचा वाढता धोका आणि आपली जबाबदारी ☆

संवाद एक विचार अनेक चर्चा सत्र 

कोरोना विषाणू जागतिक संकटातून बचावात्मक प्रतिबंधक उपाय म्हणून हा लाॅकडाऊन याची गांभीर्याने  सर्व प्रथम दखल घ्यायला हवी.  दारिद्र्य रेषेखालील लोकांना  उपासमारी,  बेरोजगारी सहन करावी लागत आहे पण महापालिका प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे.  सध्या स्थलांतर करण्यापेक्षा आहे त्या निवा-यात सुरक्षित राहून कोरोना प्रतिबंधकात्मक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. जसे वारंवार हात धुणे. घरात स्वच्छता ठेवणे. टाॅयलेट बाथरूम स्वच्छ ठेवणे वैगरे.  मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करणे  इत्यादी.

सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळले तर कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यात  आपण यशस्वी होऊ शकतो हे  लक्ष्यात  घेऊन वागायला हवे.  कोरोना बाधित  व्यक्ती जास्त निर्माण होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने दिलेल्या सुचनांचे पालन काटेकोर पणे करायला हवे.

स्थलांतर टाळून अत्यावश्यक मदत कशी मिळेल याकडे लक्ष केंद्रित करून  प्रत्येकाने  सतर्क रहाणे  क्रमप्राप्त झाले आहे. अन्नधान्य,  औषधे, जीवनावश्यक वस्तू  उपलब्ध करून देण्यात महापालिका प्रयत्नशील आहेत. त्यांना  सहकार्य करावे.  मनुष्यबळ आणि परीसर निर्जंतुकीकरण याची निकड निर्माण झाली आहे. स्थलांतरित होऊन संसर्गाचा धोका  अधिक फैलावेल तेव्हा  जिथे  आहात तिथे राहून  आरोग्य सांभाळणे अधिक महत्वाचे ठरेल.

पायी प्रवास करून संसर्गाला  खतपाणी घालण्यापेक्षा घरात सुरक्षित थांबून कोरानाचा संसर्ग  रोखता येईल असे मला वाटते.   वैद्यकीय मदत मिळेल  अशी  उपाय योजना सर्व स्तरावर व्हायला हवी. स्थलांतरित होताना होणारा संसर्ग धोका लक्षात घेऊन  आहे त्या ठिकाणी कसे सुर्य रहाता येईल याचा विचार करून  उपाय योजना करा.  गावी जाणे टाळावे.  तरच हा धोका टाळता येईल.

स्थलांतर नको, स्थित्यंतर हवे. अफवे पेक्षा मदतीचा हात अशा वेळी जास्त महत्वाचा आहे. ही मदत कशी करता येईल याचा विचार करून प्रत्येकाने  वागले पाहिजे.  टिंगल टवाळी थांबवून  गांभीर्याने ही समस्या हाताळायला हवी.

स्थलांतर  न करता अशा लोकांना अन्नदान केले तर  त्यांचा प्रवास थांबवता येईल. जन संपर्क  मदतीसाठी करावा निरर्थक जनसंपर्क टाळला तर आपण या समस्येवर मात करू शकतो.  आर्थिक मदत ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर करावी.

पुढ्यातले ताट द्या पण बसायचा पाट देऊ नका या म्हणीचा अन्वयार्थ लक्ष्यात घेऊन वागायला हवे. मदत  आणि  काळजी आरोग्य  सावधानी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. त्या पाळणे अनिवार्य आहे.

स्वतःचे, कुटुंबाचे  आरोग्य आणि स्वच्छते ची

काळजी  योग्य प्रकारे घेऊन आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणून प्रत्येक जण या  लढाईत सहभागी होण्याची वेळ  आली आहे.   .अनावश्यक  घराबाहेर पडणे टाळले तरी  आपण खूप मोठे योगदान देऊ शकतो हे लक्ष्यात घ्या. .

वेळ महत्वाची संयमाची,  वैचारीक कृतीची आहे.  आपण  घेतलेली आपली काळजी आपल्याला वाचवू शकते.  परोपकार मदतकार्य करताना माणुसकी म्हणुन करा. फोटो ची अपेक्षा धरून मदत कार्य करू नका. आता स्वतःला वाचवा  आणि मौलिक योगदान द्या. असे  आवाहन करण्याची वेळ आली आहे. जय हिंद. जय भारत.

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments