श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ भांडण ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

अपुल्या दोघांमधले भांडण

हवे कशाला त्याला कारण..?

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

दाट पिकामधला वाटे तण

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

रुसव्यानंतरचे ते साधन

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

उसळुन आलेले ते ‘मी ‘ पण

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

समजूतीचे हे अल्लडपण

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

कधी मोरपिस.. उरलेला व्रण

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

चूक.. बरोबर.. यांचे वाचन

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

सहवासाला पडते विरजण

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

भक्कम होण्याला अपुलेपण

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

प्रीत हवी तर हवेच हे पण

 *

अपुल्या दोघांमधले भांडण

कोण कशाला? मिटवू आपण

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments