श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य – आठवणी ☆
दर वर्षी ,
खूप काही वाहून जातं
ह्या पावसात…
माणसं..,
घरं…,
संसार…,…
आणखी बरंच काही…!
पण.. . ,
आठवणी मात्र
वाहून जात नाहीत..
त्या तशाच राहतात,
मनाच्या खोल तळाशी
जिथे पाऊस कधी
पोहचूच शकत नाही…..!
© श्री सुजित कदम
मो.7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




