कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 257 – विजय साहित्य ?

☆ कोसल्यात होता जीव…!

कोष रेशमी किड्याचा

त्याला कोसला हे नाव

निसर्गाची नवलाई

जन्मा येई नवे गाव…! १

अंडी रेशमी किड्यांची

उबविता सुरूवात

तुतीच्याच पानावर

रेशमाची बरसात…! २

 *

होता कोसल्यात जीव

जन्मा आली प्रेम कळी 

कोष रेशमाचा  असे

अंशमात्र एक अळी…!३

 *

परकीय चलनाचा

कोसल्यात मूलमंत्र

रेशमाची लागवड

कोष संवर्धन तंत्र…!४

 *

रेशमाचे  महावस्त्र

तानेबाने जरतारी

होता कोसल्यात जीव

साकारली प्रतवारी…!५

 *

वीण घट्ट मजबूत

असे कोसल्याचा पाया

धागा धागा जोडूनीया

केली निसर्गाने माया…!६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments