श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 292 ?

☆ मल्हार… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

पावसा मल्हार ते गाऊन गेले

पीक माझे का कसे वाहून गेले

*

ठार केले बिन विषारी साप आम्ही

शेत मग उंदीर हे खाऊन गेले

*

पंचनाम्याला दिली का हूल त्याने

लाच देणे द्यायचे राहून गेले

*

होय मंत्र्याचाच दौरा काल झाला

दैन्य आकाशातुनी पाहून गेले

*

हे पुन्हा आलेत काळे घातपाती

मेघ आकाशात ते टांगून गेले

*

लागली माती चिमुटभर चप्पलेला

कार्यकर्ते चाटण्या धावून गेले

*

वाद आले ते मिटवण्या काल होते

अन घराला आग बघ लावून गेले

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments