कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 258 – विजय साहित्य ?

☆ लोहगड…!

सह्याद्रिचा, सांगाती हा,  बुलंद  गड हा भारी.

मावळ प्रांती,मुख्य दुर्ग‌ हा,

शिवसृष्टी साकारी…! ||धृ.||

*

पर्यटकांचा, दुर्ग साहसी

दम लागे चढताना

द्वारसमुही,लोहगडाची शिल्पकला बघताना

पर्वत राजी, नाणे मावळ

निसर्ग चवरी ढाळी

मुंबई पुणे,मार्गावरती,

लोहगडाची स्वारी…! १

*

गणेश आधी,मग नारायण हनुमानी दरवाजा.

अवघड वळणे,वाट चढाची

नाही गाजावाजा.

गड मजबूती,लोहगडाची,

,बुरुज बांधणी खासी.

विश्व मान्यता,पहा मिळाली,

दुर्गांच्या संसारी…!२

*

मालवलीच्या गिरीकंदरी,

दगडांची तटबंदी.

गायमुखाचा‌, चौक आगळा

पायवाट स्वच्छंदी.

प्राचीन गुहा,पाणी टाके ,

डोंगर यात्रा नामी.

शिरी गडाच्या, वाट अनोखी

विंचू काटा वारी…!३

*

सोळा कानी, बाव गडावर,

लीन जाहला माथा

सर्पाकारी,वाट गडाची,

ऐतिहासिक गाथा.

गड मध्याला,भुयार खासे,

शिवशौर्याची नांदी.

निजामशाही पासून सोबत

लोहगडी संचारी..!४

*

बुरूजावरुनी, दिठी देतसे

आवकजावक मात्रा.

गड मैत्रीची, जोड मनोहर

करूया चालत यात्रा.

वितंड गड वा, कठीण गड ही

भाजे बेडसे लेणी.

संबळ गड हा, स्वराज्य भूषण

विसापूर शेजारी..! ५

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments