सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री विष्णू सोळंके

🪻 अभिनंदन 🪻

🌹🌹🌹 अभिनंदन 🌹🌹🌹

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक अमरावती येथील श्री विष्णू सोळंके यांचा कातरवेळी हा काव्य संग्रह आणि संवाद मौनाशी हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे.

श्री.सोळंके यांच्या नव्या साहित्य कृतींबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐✒️💐

आज त्यांची कविता “सांज मला डसते…“,कवितेचा उत्सव‘ या सदरात देत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ? 

सांज मला डसते… ☆ कवी : श्री विष्णू सोळंके

कातरवेळी संध्याछाया हळूच ही हसते

आयुष्याच्या वळणावरची सांज मला डसते…१

*

उन्हं सावली खेळत आहे प्रारब्धाची रेषा

मी कशाला कुणास दावू हातावरच्या रेषा…२

*

कशी विणावी विण सुखाची कशी म्हणावी गाणी?

मखमालीचा देश पेटला डोळा आले पाणी…३

*

निळ्या जळावर कोरुन घ्यावी नाही ऐशी नक्षी

जीव कुणावर लावून द्यावा दिसला नाही पक्षी…४

*

श्र्वास मोजके जीवन थोडे क्षणाक्षणाला घाई

सुख दुःखाच्या वाटेवरती पहाड आणि खाई…५

*

© श्री विष्णू सोळंके

अमरावती,४४४६०६

मो 7020300824

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments