श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सोबत… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

कश्याला हवा सूर्य वा चांदणे

तुझ्या सोबतीने जरी चालणे

*

“असा वागसी का..? मला बोलती

दिसेना जगा आपले वागणे

*

व्यथांनी दिले मोकळे वावरू

सुखाच्या घरी सोडले नांदणे

*

कसा कोण मध्यस्थ होईल ही

स्वतःशीच माझे सुरू भांडणे

*

इथे बंद दारे, मनांसारखी

गुन्हा हा जणू ऐकणे.. सांगणे

*

नको शब्द तो जो दुभंगे मना

पुन्हा शक्य नाही नभा सांधणे

*

नसे घोर शिक्षा कुठे याहुनी

मनाने मनाला असे टांगणे

*

खुले पंख होता थिटी ती नभे

घरी.. अंगणी सोड रे रांगणे

*

समाधान देईल शांती मना

हवे ध्यास.. हव्यास ते सांडणे

*

मनोभंग वा ती निराशा नको

नको तर्क.. अंदाजही बांधणे

*

“शिका” व्हा सुखी दुःख व्याधीत ही

शिके-ना तिथे रंजणे.. गांजणे

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
ज्योती कुळकर्णी अकोला

छान गझल