कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७३ – विजय साहित्य ?

☆ चालक तूं…!

दत्त दत्त कृपा निधी

वेद चारी तुझ्या पदी..

गोमाताही देवगणी

दत्तात्रेय नाम वदी..१

*

गुरुदेवा दिगंबरा

सत्व रज तम मूर्ती..

निजरुपे लीन होऊ

द्यावी चेतना नी स्फूर्ती..२

*

अनुसूया अत्रीऋषी

जन्म दाते त्रैमुर्तीचे..

ब्रम्हा विष्णू आणि हर

तेज आगळे मूर्तीचे..३

*

दत्त दत्त घेता नाम

भय चिंता जाई दूर

लय, स्थिती नी उत्पत्ती

कृपासिंधु येई पूर..४

*

अवधुता गुरू राया

तुझ्या दर्शना आलो‌ मी..

काया वाचा पदी तुझ्या

आनंदात त्या न्हालो मी..५

*

हरी, हर नी ब्रम्हा तू

साक्षात्कारी पालक तू

ज्ञानमूर्ती पीडाहारी

संसाराचा चालक तू..६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments