श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१३
☆ शेकोटीची लाकडं… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
रात्री थंडीने कहर केला
सूर्य देखील घाबरू गेला
चादर लपेटून धुक्याची
लपत छपत बाहेर आला
थंडी म्हटली माझ्यासमोर
रुबाब नाही करायचा
दवबिंदूही घाबरून
पानावरून पडायचा
गोधड्या नि ब्लॅंकेट
लागले होते घाबरू
त्यांनाही वाटलं आता
जाणार आपली आब्रू
झाडांवरच्या पानांना
लागलं होतं कळू
शेवटचा क्षण आहे
सारेच लागले गळू
बर्फाच्या लादीवर
शिशिर आला बसून
शेकोटीची लाकडं
गेली होती त्रासून
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






