कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २८१ – विजय साहित्य
☆ मनमीत…! ☆
☆
प्रेमाचे नाते,गुलाब जोडी
प्रेम देवता, वाढवी गोडी.
*
उत्कट उर्जा, असे केशरी
आकर्षणाची, प्रथम पायरी..!
*
मैत्री,आनंद, पिवळ्या रंगी
वेलीवरती, नवीन ढंगी…!
*
कृतज्ञतेने आनंद वाटी
रंग गुलाबी,हृदयी दाटी…!
*
समर्पणाचा, लाल गुलाब
देई वचने, नसे रूबाब…!
*
श्वेत पांढरा, लक्ष वेधतो
शुद्ध भावना, नाते जपतो..!
*
उत्साह इच्छा, उत्कट भाव
रंग नारिंगी, वसवी गाव..!
*
आदर आणि,गूढ भावना
रंग जांभळा, पूर्ण कामना..!
*
सुख समृद्धी, प्रेम लाजरे
हिरव्या रंगी, होय साजरे…!
*
गुलाब काळा,दडून राही
वैर भावना, मनात साही..!
*
गुलाब रंगी, मने सांडली
प्रेम भावना, तिथे नांदली..!
*
रंगामधूनी, उमले प्रीत
देई शोधून, हा मनमीत…!
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





