श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१८
☆ तपस्या… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
तुडवला मार्ग मी खडतर?
मिळवण्या देह हा नश्वर
*
पुढ्यातच ती उभी रंभा
मनाला थांबवू कुठवर
*
जगाचे बोट धरुनी मी
कळेना जायचे कुठवर
*
शिवाचे घर तिथे आहे
नगाच्या उंच शिखरावर
*
अशी केली तपस्या मी
सुखाला मारुनी ठोकर
*
सुरक्षा कवच मेंढीचे
कशी ती पांघरू लोकर
*
कबीरासारखा दोहा
विणावा होउनी विणकर
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





