श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२०
☆ दिव्यत्वाची शक्ती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मी दगड कोरला देवा तू त्यात भेटला होता
अन् छन्नी हातोड्याचा आघात सोसला होता
*
देवा तू सोबत होता मी म्हणून चुकलो नाही
तू माझ्या ह्या हाताचा सन्मान राखला होता
*
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली डोळ्यांदेखत
डोळ्यांचे सोने झाले मी श्वास रोखला होता
*
मज बहाल केली देवा तू दिव्यत्वाची शक्ती
पाषाण म्हणूनच मी तो नेमका जोखला होता
*
असुरांची टोळी होती मूर्तीला दगड म्हणाली
थडग्यांना पुजणारांनी तो डाव फेकला होता
*
मातेची आज्ञा झाली तू वनात गेला तेव्हा
वनवास पाच शतकांचा कलियुगी भोगला होता
*
ह्या आयोध्या नगरीचे प्रारब्ध उजळले आता
त्या जुलमी सत्तेनंतर तू उभा ठाकला होता
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





