श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “चांदण्याची फुलं” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

उजेडाच्या झाडाला गं चांदण्यांची पुलं

मनाच्या आंगणी तुझ्या यशाचीच फुलं

थकतील हात तरी येवढंच काम

उचलून हुंगायची आंगणात फुलं

 *

आनंदाची बाग, बागडावं मनसोक्त

रात्रीतून वेचायची चांदण्यांची फुल

 *

चांदणी ती तुझी, छोटुलीला मी दाखवी

तिनेच ना पाठवली चांदण्यांची फुलं?

मनाच्या त्या गाभा-यात असेल का जागा?

वहायला माझ्यासाठी चांदण्यांची फुलं

सांग तुझ्या छोटुलीला म्हाता-याची गोष्ट

आणि सांग वहायला चांदण्यांची फुलं.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments