श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – विठ्ठल गीती गावा … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

काव्यानंद

*

विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा /

विठ्ठल उभा पहावा विटेवरीं //१//

अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु /

तोडी भवबंधु यमपाश //२//

*

तोचि शरणागतां विठ्ठल मुक्तिदाता /

विठ्ठल या संतासमागमें //३//

*

विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धी/

लागली समाधी विठ्ठल नामें //४//

*

विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख/

गोडावलें मुख तुका म्हणे//५//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

आपल्या आवडीच्या आराध्य दैवताचे गुणवर्णन करताना तुकाराम महाराज आपले देहभान विसरून त्यांच्या नामघोषात तल्लीन होऊन जातं असतं. विठ्ठलाचे नामस्मरण का करावे याची कारणे सांगताना महाराज म्हणतात ”

आपण आपल्या ध्यानीमनी विठ्ठल साठवावा. त्याची विटेवर समचरणात उभी असणारी मुर्ती मनचक्षु समोर सतत ठेवावी आणि आपल्या मुखाने त्याचेच गीत गात त्याचे गुणगान करावे. कारण तो अनाथांचा बंधु आहे. म्हणून त्याला दीनबंधू म्हणतात. तो करूणाकर आहे. कृपेचा सागर आहे. तो भवबंधच नाही तर आपल्या भोवती असणारे यमपाशही सहज तोडून टाकतो. तो शरण येणार-या भक्तास सहज मुक्ती मिळवून देतो. आणि संतांच्या संगतीत तो रममाण झालेला असतो. विठ्ठल सर्व गुणसंपन्न आहे. त्याच्या चरणीच आपण त्याचे नामस्मरण करत समाधीस्त झालो तर आपणासही सर्व सिद्धी प्राप्त होतील. विठ्ठलाचे नुसते नामस्मरण केले तरी सर्व सुखे मिळतात आणि मुखाला आपोआपच गोडी येते. अशी पराकोटीची भक्ती केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments