श्री प्रमोद वामन वर्तक

☆ क्षण सृजनाचा ☆ अंतिम सत्य श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

वाळल्यावर गळून पडलेल्या एका पानाने, आपल्या मातेसमान झाडाबद्दल तक्रार करण्यास सुरवात केली. तेंव्हा त्या मातेने त्याला कशा प्रकारचे उत्तर दिले असते, ते या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 🙏

👍अंतिम सत्य! 🙏

*

दोष देऊ नको मजला

त्यागिले न मी तुजला,

जे लिहिले होते प्राक्तनी

भोग त्याचा न चुकला!

*

पालन पोषण केले तुमचे

वाढविले प्रेमाने तनुवर,

माझ्याच अवयवास मी

सांग कसे करीन दूर?

*

फुटे अंगावर पालवी

निसर्ग नियमाला धरून,

जीर्ण शीर्ण सुकली पाने

जाती वाऱ्यासवे उडून!

*

होण्या ताटातूट आपली

नसे माझाच कधी हात,

आणू नकोस मनात किंतु

केला नाही विश्वासघात!

*

जो जन्मला या जगात

सवे मरण घेऊन आला,

कटू सत्य हे पचवी जो,

तोच खरे जीवन जगला!

तोच खरे जीवन जगला!

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments