सुश्री संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ कबाड से जुगाड… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
काल हे वाक्य ऐकलं. ••••
माझी मैत्रीण, मंजू खूप हुशार, स्मार्ट आणि खूप creative. •••• काल तिने आपल्या बगीच्याचे फोटो पाठविले. तिचे छोटेसे Terrace garden. •••पण खूप सुंदर. •••कलात्मकतेने सजविलेले•••. एकदम colourful, vibrant •••. तिचे प्रत्त्येक काम जरा ‘ हटके’ असत. मस्तच असत. ••••
त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे तिने लिहिलेलं एक वाक्य •••
This is all from, ••• “कबाड से जुगाड”
कबाड म्हणजे तुटक्या-फुटक्या •••, खराब झालेल्या, •••वापरायला उपयोगी नसलेल्या, ••• फेकायच्या •••, किंवा काही कामाच्या नसलेल्या वस्तू ••• आणि त्यापासून एवढं सुंदर काम. व्वा खूप कौतुक वाटलं मला मंजूचे. ••••••
मला ‘कबाडचा’ अर्थ छान माहिती आहे. कारण माझ्या घरात भरपूर आहे. मी जपून ठेवला आहे ना. ••••कधी तरी कामी येईल. म्हणून•••• हा मनात येणारा पहिला विचार. •••• म्हणून ठेवायचे. •••पण वर्षानुवर्षे निघून जातात, •••पण ती वस्तु काही कामी तर येत नाहीच. •••आपल्या जवळ अशी काही वस्तू आहे, हे पण लक्षात रहात नाही. •••कुठे ठेवली आहे??? हे तर प्रयत्न करुनही आठवत नाही. ••• खुप सांभाळुन ठेवलेली असते ना. •••हे सर्व माहिती असतं, तरी ठेवायचे •••. मुलं, नवरा म्हणतातही. •••• अग! फेक ना. हो, हो फेकते. फक्त म्हणायचे. •••••
मी रोड झाले की हा ड्रेस मला होईल. •••रोड होणे जमतं नाही. •••तो ड्रेस काही कामी येत नाही. •••कान नसलेला कप। म्हणे पेन stand म्हणून वापरता येईल. •••, झाकण नसलेली बरणी, कदाचित मनी प्लांट लावायच्या कामी येईल •••••. हॅंडल नसलेला तवा, फोडणीचे भांडे. cracked steel चे डबे प्लास्टिक चे डबे. या तरी मोठया वस्तु झाल्या. अहो, ना•••डा पूर्ण दोन मीटरचा नाही बरं, फक्त एक नाड्याचा छोटासा तुकडा. •••• कधी तरी कामी येतो म्हणे ••••, काही बांधायला श्रीखंडाचा चक्का वगैरे. •••, कानातला एकच(साधाच) टॉप. कारण दुसरा हारवून गेलेला आहे. पुन्हा मिळेल या आशेने सांभाळुन ठेवायचा. ••••
या वस्तू मी का ठेवल्या??? तर कधी कामी येतील म्हणून. ••• यातील एकही वस्तू माझ्या करिता कामाची नाही •••. हे मला माहीत आहे. ••• आणि प्रामाणिकपणे सांगते, ••त्यातील एकही वस्तू पुन्हा वापरली जात नाही. एक तर ती वापरण्यासाठी नसते. ••• दुसरं म्हणजे माझ्यात तेवढी कलात्मकता नाही •••अशी, creativity माझ्यात नाही. की त्या गोष्टींचा वापर/जुगाड करून काही तरी नवीन करेन••••
मग मी का फेकत नाही??? फक्त ‘लोभ ‘ व ‘मोह ‘ बाकी काही नाही. •••नंतर फेकते असं म्हणत ••• नंतर नंतर ••••करत या वस्तुंनी घरातली खूप जागा अडवून ठेवली आहे •••.
घर स्वच्छ करणे म्हणजे ही अडगळ पण बाहेर टाकणे होय. ••••घरात असंख्य वस्तू अशा असतील ज्या वेळेवर दिल्या, काही वस्तू, कपडे वगैरे तर दुसऱ्यांच्या कामी नक्की येऊ शकतात. ••• अडगळ काढली तर घरातील negativity जाते म्हणे. ••••.
त्यामुळे मला ‘कबाड’ शब्दाचा अर्थ चांगला माहीत आहे ••••आणि ” कबाड से जुगाड “करून तयार केलेले जग प्रसिद्ध चंडीगढ चे ” रॉक गार्डन” मी बघीतले आहे. या गार्डन चे शिल्पकार श्री नेमीचंद यांच्या ‘कबाड हे जुगाड ‘कलाकुसरीचे खरच खूप कौतुक आहे. •••••
पण असे किती जण असतात???? शंभर पाचशे मधे एखादी स्त्री किंवा पुरुष असेल •••. जी खरच अशा वस्तुंचा वापर करून काही तरी सुबक वस्तू तयार करत असेल •••”. Best from waste “म्हणतात ना ते. ••••
पण नव्याण्णव % बायका फक्त वस्तू जमवून ठेवतात. कधी तरी कामी येईल म्हणून. •••••
बरेचदा बाजारात नवीन प्रकारच्या वस्तू आपण घेतो •••. पण जून्या वस्तू तशाच ठेवतो. •• घरात किती तरी चांगल्या, पण वापरात नसलेल्या वस्तू, उगीच पडून असतात••• कोणाच्या तरी नक्की उपयोगी पडू शकतील. •••••
ते कबाड नाही. •••कोणाच्या तरी कामी येऊ शकणाऱ्या वस्तू आहेत त्या. ••. मग लगेचच द्यावे ना ••••.
द्यायलाही शिकले पाहिजे ••••
माणूस म्हणजे कधी ही न समजणारा प्राणी. •••आणि त्यात स्त्री म्हणजे विचारायलाच नको. स्त्री ला समजणे तर अशक्यच •••कशात जीव गुंतलेला असेल सांगता येत नाही. ••••••
आणि वस्तू “फेकणे “किंवा कोणाला “देणे” तेवढे सोप्पं नाही. त्याकरिता मोठ्ठं मन असावं लागतं•••••
आज तर ” USE. And THROW ” चा ज़माना आहे. ••••
चला, तर मग कबाड साफ करूया, घरातील आणि मनातील सुध्दा. •••
कोरोनाने हात धुवायची, स्वच्छतेची सवय लावलेली आहेच. •••आता घर व मन पण स्वच्छ करूया. •• मनातील अडगळ •••• हेवेदावे, मत्सर, अहंकार, दुःखदायक आठवणी बाहेर काढून टाकुया. ••••
ही दिवाळी वेगळी साजरी करू या. ••••
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
© सुश्री संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






