सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ माझ्या आर्मी लाईफची एक झलक… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“हा लेख सेनेच्या सर्व Lady Wives ना समर्पित करते.”  

“Proud To Be A Wife Of an Indian Soldier.” 

आज आम्ही सर्व बहिणी एकत्र जमलो होतो. आमचे स्पेशल गेटटूगेदर होते. ताईच्या घरी नुकतेच renovation झाल्यामुळे घर मस्त दिसत होते. आता त्यांनी वयाच्या व सवयींच्या अनुरूप घरात चेंजेस केले होते. ••••

ताई म्हणाली, •••

अग!! तीस वर्षे झाली. लग्नानंतर काही वर्षांनी आम्ही या घरात रहायला आलो. तेच ते बघून बघून कंटाळा आला होता. मुलांची शिक्षण, लग्न सर्व याच घरात झाली. ••••

मी हसले, •••तर ताई म्हणाली, ••• का ग? कशाला हसलीस?? ••••

मी म्हंटल, ••• अग!! या तीस वर्षांत तर मी अक्षरशः अर्ध्या भारतभर फिरले. या अवधीत किती घर बदलली??? मुलांच्या किती शाळा बदलल्या??? मोजावेच लागेल मला. •••

आता मात्र सर्वांची उत्सुकता वाढली. ••••

‘आर्मी लाईफ ‘ वेगळेच असते. त्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकताही असते. काही समज गैरसमज ही असतात. आज सर्वांनी आग्रह केला, म्हणून मी त्यांना माझ्या तीस वर्षांहून जास्त आर्मी लाईफचा अनुभव सांगायला सुरुवात केली. •••••

मी म्हंटल, •••••

लग्नानंतर सामान्यतः एका स्त्री चे आयुष्य म्हणजे तिचा नवरा, त्याची नोकरी, मुले त्यांचे शिक्षण, घर सांभाळणे. प्रामुख्याने हेच तिचे विश्व असते. नवऱ्याच्या नोकरीवर तिचे आयुष्य अवलंबून असते. दोघांनी मिळून घराकडे लक्ष द्यायचे. हा एक साधारण अलिखित करार असतो. ••••

परंतु ‘आर्मी ऑफिसर’ बरोबर लग्न झाल्यावर हे समीकरण थोडं बदलत. कारण 

” An Army man is on duty for 24 hours. “••••

येथे ‘No ‘ शब्द चालतच नाही. It is always ‘YES ‘ and only ‘YES. ‘ •••

नोकरी बरोबर मधून मधून कोर्सेसही असतात. युद्ध व्हाव अस कधीच कोणाला वाटत नाही. पण झालंच तर तुमची तयारी असावी. म्हणून “जीत का मंत्र ” द्यायला,

“लक्ष्य की ओर हमेशा अग्रसर ‘ रहायला ‘physically mentally toughness’ जागृत ठेवायला, वेगवेगळे कोर्सेस होत राहतात. कोणत्याही वेळेस युद्ध जिंकायला तयार असणे. याची तयारी होत असते. ••••

” Actually, Any army personnel is paid for this day only. ” ••••

” आधी देशाचे काम मग घरचे. ” हा साधा सरळ हिशोब असतो. ••••

हे सर्व नोकरीत रुजू व्हायच्या आधी माहीत असतंच. ही नोकरी करणे तुमचा ‘choice’ असतो. तुम्हीच ठरविलेले असते. आर्मी ऑफिसर शी लग्न झाल्यावर का?? कशाला?? मीच का?? असे प्रश्न उद्भवतच नाही. •••••

म्हणून बायकोची जबाबदारी वाढते. ••••

आता थोडं माझ्या बद्दल म्हणजे जनरल ‘army wives ‘ बद्दल सांगायचे झाले तर थोडया फार फरकाने सर्वांची स्टोरी मिळतीजुळतीच असते. ••••••• 

रिटायरमेंट नंतर, सध्या ज्या घरात मी पर्मनंट राहते आहे, ते माझ्या आयुष्यातले ‘वीसावे’ घर आहे. म्हणजे आजपर्यंत मी

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळया घरात राहिले. कधी दहा खोल्यांचा जून्या ब्रिटिशकालीन बंगल्यात, तर कधी अगदी दोन खोल्यांचे घर.

प्रत्त्येक ‘ posting ‘ मधे अशीच तयारी करायची की, कुठेही सहज राहता येईल. स्वयंपाक करता येईल. म्हणजे प्रत्येक posting मधे ‘mini ‘ संसाराच्या चार पेट्या तयार करायच्या. व वेळ निभावून घ्यायची. ” स्वयंपाक, शाळा, अभ्यास “या तीन गोष्टींना प्राथमिकता द्यायची व नवीन जागी लवकरात लवकर ‘ adjust ‘ व्हायचा प्रयत्न करायचा. आमच्या ‘comfort’ ची व्याख्या खूप सीमीत होती. •••••

प्रत्त्येक ‘ posting ‘मधे दोन तीन पेट्या वाढायच्याच. असं म्हणतात, ••• पेटयांचा टोटल नंबर मोजून आर्मी ऑफिसर ची ‘Rank’ व एकंदर किती’ postings ‘ झाल्या ते कळत. आम्ही रिटायर्ड झालो, तेंव्हा ‘सत्तर’ पेटया होत्या. म्हणजे नोकरीच्या पस्तीस वर्षाचा आमचा संसार त्या जीवाभावाच्या पेट्यांमधे होता. ••••

तुमचे विचार खूप स्पष्ट असले, तर तुम्ही तुमचे आयुष्य छान प्लान करू शकता. आम्हाला या नोकरीचे प्लस मायनस points माहीत होते. म्हणून आम्ही आधीच ठरविले की व्यवस्थित रहायचे. मग पेटयांचा नंबर वाढणारच. त्या टिपिकल काळया लाकडी पेट्या खूप कामाच्या होत्या. त्यांनी आयुष्यभर खूप इमानदारीने आमची साथ दिली. कधी पलंग, तर कधी setty. आवश्यकतेनुसार त्यात सामान ठेवून वेळोवेळी काळया पेटयांची मदत झाली. ••••

आता मुलींच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर, माझ्या मुलीने बारावी पास होईपर्यंत बारा शाळांमधून शिक्षण घेतले. म्हणजे साधारण प्रत्त्येक वर्षी •••नवीन शाळा, शिक्षक, मित्र मैत्रीणी बदलायच्या. प्रत्त्येक नवीन जागी स्वतःला प्रूव्ह करायचे. बर, हे सर्व वर्ष सुरू होण्यापुर्वीच होईल असे नाही. एकदा तर ‘ half yearly ‘ परीक्षेच्या एक दिवस आधी अॅडमिशन घेतली. दुसऱ्या दिवशी पासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे सिलेबस व रोल नंबर घेऊन घरी आलो. ‘उधमपूर ‘ ‘जम्मू काश्मीर’ मधील‌ ही नवीन जागा, ती पण पहाडी, शाळेत admission साठी जाताना एक मुलगी रडली व येताना दुसरी. व त्यात आणखी भर‌, म्हणजे त्यांचे बाबा आमच्या बरोबर नवीन जागी नव्हते. वेळेवर काही कारणाने त्यांना थांबावे लागले. मी मुलींना घेऊन उधमपूर ला पोचले होते. मला तो दिवस चांगला आठवतो. त्यादिवशी दोघींनी दहा बारा तास अभ्यास करून दुसऱ्या दिवशी च्या परीक्षेची तयारी केली होती. कारण सिलेबस वेगळा होता. •••

आर्मी मध्ये नेहमी नवऱ्या बरोबर राहता येईलच, असे नसते, Field posting’ मधे फॅमिलीला बरोबर राहता येत नाही. म्हणून अशा तडजोडी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच. यात एकच खंत वाटते की अगदी लहानपणापासूनचे बरोबर शिकलेले मित्र मैत्रीणी माझ्या मुलींना नाहीत. •••

यातही एक सकारात्मक विचार असा की •••• प्रत्येक नवीन स्टेशन वर, नवीन मुलांमध्ये, पहिल्या ‘पाच ‘ मधे तुम्ही आपली पोझिशन मेन्टेन ठेवली, तर‌ आयुष्यात पूढे द्याव्या लागणाऱ्या ‘competitive ‘ परीक्षेची तयारी आपोआपच होत जाते. मुलेही टफ लाईफला सामोरे जायला हळूहळू शिकतात. हे सर्व खूप सोप्प नक्कीच नव्हतं, पण दुसरा पर्याय ही नव्हता. बरे असो, याचा प्रभावी परिणाम आता दिसतोय. सर्वांना कुठेही सहज adjust होता येत. ••••

आर्मी म्हणजे एक ‘स्टाइल ‘आहे. एक ‘standard ‘आहे. ‘Status ‘ आहे. बायकांचा ‘ड्रेसिंग सेन्स’ छान असतो. खूप काही नसतानाही ‘limited budget ‘ मधे‌ व्यवस्थित राहणे जमते त्यांना. ‘clean and organised home ‘ ही विशेषता असते त्यांची. Quality of life is v good. वेळेचे महत्व, attiquett manners, junior-senior respect एक protocol असतो. तो पाळायचाच असतो. अनुशासन कडक असते. ••••

lunch \ dinner party चे एक ‘स्टेटस’ असते. एक ‘पद्धत’ असते. तेथे मराठी पणा बाजूला ठेवूनच वागावे लागते. बायकांना खूप मान असतो. म्हणजे अगदी ज्युनिअर आॅफिसरच्या बायकोच्या वेलकम साठी सिनीयर मोस्ट आॅफिसर सुद्धा उभा राहतो. आर्मीत कोणत्याही ‘official ‘ फंक्शन ला seniority व rank च्या हिशोबाने यायची वेळ दिली जाते. ••••

आर्मी म्हणजे एक असे ‘organization’ आहे, जेथे तुमचा ‘personality development program ‘ सतत सहज सुरूच असतो. नवीन जागा, नवीन माणसे, पण त्या त्या शहराचे कल्चर तुम्हाला अनुभवायला मिळते. वेगवेगळे प्रसंग बघून तुमचे व्यक्तिमत्त्व खुलते, बहरते. विचारांची रेंज वाढते. Priorities बदलतात. बायकांना बऱ्याच activities मधे भाग घ्यावा लागतो.

Ladies club, AWWA म्हणजे ‘Army Wives Welfare Association ‘जेथे आम्ही Unit च्या सर्व बायका एकत्र जमतो. काही तरी नवीन शिकतो, शिकवतो. •••

म्हणतात ना, ••••

” जिंदगी खट्टी मीठी होनी चाहिए ।”•••

आर्मीवाल्यांना फक्त खट्टा मीठा च नाही तर, सर्व प्रकारचे अनेक स्वाद सहज चाखायला मिळतात… आजही किती तरी प्रसंग मनावर कोरले गेले आहेत. ••••

ताई म्हणाली, •••सगळयात कठीण posting / वेळ कोणती होती ग??? ••••

मी म्हंटल, ••• अग!!! अंदमान, नागालँड सिक्कीम या थोड्या वेगळ्या postings होत्या. अंदमान ला शाळा फक्त नावालाच होती. •••••

मी जो कठीण काळ बघीतला, तो म्हणजे ‘कारगिल युद्ध ‘. त्यात यांचा सहभाग होता. ते चार महिने हे नक्की कुठे आहेत?? हेही माहीत नसायचे. सर्व पत्रांची ‘ scrutiny ‘ व्हायची. तेंव्हा मोबाईल वगैरे वापरायची परवानगी नसतेच. प्रत्त्येक आठवड्यात एक ऑफिसर पंचवीस किलोमीटर दूर जाऊन आपल्या घरी फोन करून सर्वांची खुशाली कळवत असे. TV वरील रोजच्या बातम्या ऐकून जीव खालीवर व्हायचा. यावेळेस आपली जबाबदारी जास्त आहे, हेही समजत होतच. मुलींकडे लक्ष देणे, त्यांना सांभाळणे हे महत्त्वाचे काम होते. मुलींनी मात्र खूप साथ दिली. विचलित न होता धैर्याने प्रत्त्येक जण आपले काम करत होता. या परिस्थितित माझी responsibility फक्त माझे घरच नाही तर, ‘Unit ‘ च्या इतर families ला सांभाळणे ही पण होती. Unit च्या बायकांना मानसिक आधार देणे. त्यांचे छोटे मोठे प्रश्न सोडविणे, मुलांच्या आजारपणात त्यांची मदत करणे. ही पण जबाबदारी होतीच. ••••.

मी कधी युनिफॉर्म घातला नाही. हातात बंदूक घेतली नाही. परंतु मी silently गोळ्यांचा आवाज ऐकला आहे. मी आर्मी लाइफ जगले आहे, अनुभवली आहे. या नोकरीने आयुष्यात सर्व रंग दाखविले. चांगले -वाईट अनुभव, उतार चढाव बघितल्याने आता कोणत्याही परिस्थितीत आम्ही ‘मजेतच’ असतो. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची हिम्मत ठेवतो. ••••

We do not grow, when things are easy.

We grow when we face challenges.

Life is not a bad story, sometimes you read a bad chater. That’s it.

आजही युनिफॉर्म घातलेला कोणी दिसला की आनंद होतो. सख्खा नातेवाईक भेटल्या सारखे वाटते. आमचे ‘ते ‘ दिवस पुन्हा एकदा नजरेसमोरून जातात. उर्जा वाढते. ••••

‘Challenges ‘ प्रत्त्येकच नोकरीत असतात. काम कोणतेही सोपे नसतेच. प्रत्त्येक जण आपापल्या परीने सेवा /मदत करतोच. तरीही आर्मीत नोकरी करायची आवड / aptitude असावा लागतो. उगीच ओढून ताणून ही नोकरी करता येत नाही. ••••

ही नोकरी म्हणजे, •••

” It’s different. “•••

‘uniform ‘ची एक ‘grace’ असते ‘वजन’ असतं. घालणाऱ्या च्या चेहऱ्यावर जबाबदारी पेलायचा ‘आत्मविश्वास ‘असतो. •••

“मैं हुं ना ” चे आश्वासन चेहऱ्यावर दिसते.

अनेक वर्षापुर्वी चां तो दिवस मला आजही आठवतोय, जेंव्हा आम्ही भेटलो होतो तेंव्हा, ••••••

“I asked him, ••• how much do you earn??

He said, ••• roughly hundred salutes a day. And we got married. ” “•••••

मला लग्नात मिळालेला सर्वात मुल्यवान दागिना म्हणजे तो ‘green uniform ‘व त्यावर त्यावेळी लागलेले ते तीन *STARS* *** होते. त्यांची किंमत आखणारे किंवा ‘purity ‘ चेक करणारे मशीन कोणत्याही सोनाराजवळ नाही. ••••

वयानुसार केस पांढरे होत गेले व खांद्यावरील * STARS * वाढत गेले. जेवढ नशीबात होत तेवढं मिळाल. पैशापेक्षा अनुभवाने श्रीमंत झालो आम्ही. एकाच जन्मात किती तरी बघायला मिळालं. अगदी रिटायर्ड व्हायच्या थोडे दिवस आधी ‘लेह लडाख ‘ मधे झालेल्या ‘ढग फूटी’ च्या वेळेस मेडीकल कव्हर द्यायला हे गेले होते. ••••

‘फूल नाही पण फूलाची पाकळी ‘एवढे आपले योगदान देऊन आम्ही ‘समाधानाने’ व ‘अभिमानाने ‘ रिटायर्ड झालो. •••

या जन्मात आर्मी ऑफिसर च्या ‘बायकोची’ भूमिका होती. पूढच्या जन्मात ही हीच भूमिका करायला मला नक्की आवडेल. •••

आज मन किती तरी जागी फिरून आले. खूपदा डोळे भरून आले. •••

माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरील मिश्रित भाव मी वाचू शकत होते.. ••••

” Proud To Be a Wife of an Indian Soldier. “••••

•••• ‘जय हिंद’ ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted