सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 278
☆ कादंबरी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
मंदिरी आराधना
सागरी आराधना
*
कोण जाणे कोणती
सावरी आराधना
*
कृष्ण राधे सारखी
पावरी आराधना
*
मत्स्यमा-या नेहमी
म्हावरी आराधना
*
पौर्णिमेला जागते
जागरी आराधना
*
दीपपूजेच्या दिनी
शर्वरी आराधना
*
एकदा लाभो मला
भर्जरी आराधना
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





पावरी, म्हावरी यांचे अर्थ सांगाल का