सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९३ ?

☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

भावनांचे चक्र येथे ना कधीही थांबते

जीवनाचा खेळ आता मी नव्याने खेळते

*

मी कशी सांगू कुणाला वेदना हृदयातली?

कसनुसे आणून हासू चेहरा सांभाळते

*

भाळले होते तुझ्यावर, हे तुला कळलेच ना ,

मी उगाचच हे जगाला सांजवेळी सांगते

*

चेहरा माझा कधीचा पाहिला ना दर्पणी

कालचे प्रतिबिंब माझे मी तुझ्यातच पाहते

*

वादळाची ना तमा, ना आसऱ्याची लालसा

मुक्त झाले या क्षणाला, ही कुडीही त्यागते

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments