प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२१ ?

☆ पाऊस ☆  प्रभा सोनवणे ☆

पाऊस असा पाऊस तसा

पाऊस आहे कसा कसा …

*

पाऊस आहे मस्त कलंदर ,

खट्याळ ,खोडकर आणि बिलंदर !

*

पाऊस आहे निर्मळ, प्रेमळ

तसाच पाऊस भलताच चंचल!

*

पाऊस मुक्त पाऊस अनुरक्त

पाऊस असतो आसक्त !

*

पाऊस रिमझिम, पाऊस घनघोर ,

कधी विनयशील, कधी शिरजोर !

*

सांगू पाऊस कुणासारखा ?

लहरी लबाड नवऱ्या सारखा .

*

पाऊस वाटतो हवाहवासा

मनातनावर बरसावासा !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted