शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बहावा फुलला… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

बहावा फुलला…

बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो.

याला पावसाचा “नेचर इंडीकेटर” असेही म्हणतात, या वर्षी हा लवकर फुलला आहे.

आता साधारण 28 मे नंतर पाऊस पडेल. या झाडाला शॉवर  ऑफ फॉरेस्ट  असेही म्हणतात.

आणि या वृक्षाचा अंदाज अचूक असतो…

 *

नकळत येती ओठावरती

तुला पाहता शब्द वाहवा,

सोनवर्खिले झुंबर लेउन

दिमाखात हा उभा बहावा ।

 *

लोलक इवले धम्मक पिवळे

दवबिंदूतुन बघ लुकलुकती,

हिरवी पर्णे जणू कोंदणे

साज पाचुचा तया चढवती ॥

 *

कधी दिसे नववधू बावरी

हळद माखली तनु सावरते

झुळुकीसंगे दल थरथरता

डूल कानिचे जणू हालते ।

 *

युवतीच्या कमनीय कटीवर

झोके घेई रम्य मेखला,

की धरणीवर नक्षत्रांचा

गंधर्वांनी झुला बांधला ॥

 *

पीतांबर नेसुनी युगंधर

जणू झळकला या भूलोकी,

पुन्हा एकदा पार्थासाठी

गीताई तो सांगे श्लोकी ।

 *

ज्या ज्या वेळी अवघड होई

ग्रीष्माचा तुज दाह सहाया,

त्या त्या वेळी अवतरेन मी

बहावा रुपे तुज सुखवाया ॥

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted