वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ संध्याकाळचा स्वयंपाक “ कवयित्री : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

☆

 संध्याकाळचा स्वयंपाक हा

वाटतो तितका सोपा नसतो,

सकाळचा एकवेळ परवडला

पण संध्याकाळी नको वाटतो…

* 

चारीठाव स्वयंपाकाने दिवसाची

सुरुवात कशी छान होते,

पण संध्याकाळी काय करू

या विचारांनीच धडकी भरते…

 *

एक तर सकाळ सारखं

संध्याकाळी नको असतं,

रोज रोज बाहेरून मागवणं

तब्ब्येतीला बरं नसतं…

 *

खिचडी तशी सख्खी वाटते

पण रोज कशी करायची ना,

थालीपीठ आणि धिरडी म्हणजे

परत मेहनत आलीच ना…

 *

सकाळचा तो वरणभात

थोडा तरी उरलाच असतो,

त्याला पुरवठा काय करू

हा यक्ष प्रश्न सतावत असतो…

 *

तेलकट नको तुपकट नको

पुलाव बिर्याणी रोज कशी,

त्याला चालतो नुसता भात ही

पण मला पोळी हवी जराशी…

 *

पोळ्यांचा कुस्करा, फोडणीचा भात

तसा सोपा जातो करायला,

पण त्यासाठी सकाळच्या

पोळ्या नकोत का उरायला…

 *

उसळी, सोजी, सांजा, उपमा

ह्यांना नाष्यात जागा मिळाली आहे,

ब्रेड, पिझ्झा, सँडविच ह्यांच्या

मैद्याने झोप उडवली आहे…

 *

काय करावे सांगा मग

साधी गोष्ट वाटते का?

संध्याकाळचा स्वयंपाक

सांगा तुमची पण झोप उडवतो का?

☆

कवयित्री:अज्ञात

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted