श्री सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ अर्जंट पाहिजेत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
अर्जंट पाहिजेत
– – – इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा
एक शिंपी पाहिजे,
जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल
एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,
जो एकमेकांशी न बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये
पुन्हा एकदा कनेक्शन जोडून देईल,
एक ऑप्टिशियन पाहिजे,
जो लोकांची दृष्टी आणि
दृष्टीकोन नीट करून देईल,
एक कलाकार पाहिजे,
जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित
हास्याच्या रेषा रेखाटू शकेल,
एक बांधकाम कामगार पाहिजे,
जो दोन शेजाऱ्यांमध्ये
उत्तम सेतू उभारू शकेल,
एक माळी काका पाहजे,
जो चांगल्या विचारांच
रोपण करू शकेल,
एक प्लंबर पाहिजे,
जो तुंबलेल्या मनांना
मोकळं करू शकेल,
एक शास्त्रज्ञ पाहिजे,
जो एकमेकांबद्दलची
ओढ शोधू शकेल,
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,
एक शिक्षक पाहिजे,
जो एकमेकांशी संवाद कसा
साधायचा ते शिकवू शकेल,
आज तुम्हा-आम्हा, सर्वांना
याचीच नितांत गरज आहे..!!
☆
संपर्क :- माणसाने माणसाशी करावा.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






