सौ. मंजुषा सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “स्वयंपाकघर” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
स्वयंपाकघर म्हणजे एक छोटीशी कंपनी
आपणच असतो फाऊंडर, एखाद-दोन व्यक्ती कामं करायला हाताखाली
रोजचं नवीन प्रोजेक्ट, रोजचीच डेडलाईन
सकाळी 6 ला उघडणार ऑफिस, ते थेट रात्री नाईन
काहीवेळा वीकएंडला शटडाऊन, तर ओव्हरटाईम सणावारी
वर्षातले 300 दिवस प्रोजेक्ट ‘जेवायला काय?’ चं भूत मानगुटीवरी
ऑफिसला जावं लागत नाही, कायम वर्क फ्रॉम होम असतं
या ऑफिसमध्ये काम करणं इतकंही सोपं नसतं
महिन्याच्या महिन्याला भरावं लागतं सामान, स्टॉक अपडेट करायला लागतो
आवडीनिवडी आणि आरोग्य ह्यांचा मेळ घालावा लागतो
इथे चालत नसतो आयपॅड आणि लॅपटॉप
इथे असतो फक्त पोळपाट आणि हॉटपॉट
दर आठवड्याला प्रोजेक्ट ‘भाजीपाला’ असतं
त्यानुसारच आठवड्याचं प्लॅनिंग करावं लागतं
आलंच एखादं इस्कलेशन, त्यांनुसार घ्यावे लागतात कॉल
शांत राहून करावे लागतात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह
आठवड्यातून एकवेळ तरी बंद ठेवावी भट्टी
आराम करावा, घ्यावी मस्त सुट्टी
आठवडाभर असतेच की ओट्याशी गट्टी
भांडीकुंडी आणि गॅसशी घ्यावी तात्पुरती कट्टी
‘जगात भारी’ हेच अप्रेजल आणि हाच परफॉर्मन्स बोनस, खुश होते स्वारी
कंपनीच्या यशाची हीच तर किमया न्यारी
इथे आपणच आपले असतो बॉस
गैरहजेरीत आपल्या, होतो खूप केऑस
या कंपनीतून रिटायरमेंट मात्र योग्यवेळी घ्यावी
कंपनीची किल्ली लगेच सुपूर्द करावी
गरज लागलीच तर मदत करावी
नाहीतर रिटायरमेंट मस्त एंजॉय करावी
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





