स्वाती मंत्री
वाचताना वेचलेले
☆ जाता जाता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆
☆
तळाशी जाता जाता,
आधी अंगावर लादलेली कौतुकाची निर्माल्यं उतरवून ठेवायची..
मग अपेक्षांचा अबीरबुक्का तरंगू द्यायचा पाण्यावर,
अलंकारांचं ओझं हलकं करायचं,
कालांतराने
स्वतःला गोंडस बनवणारे रंगाचे थर विरघळू द्यायचे ..
इतरांनी आपल्यावर चढवलेल्या
श्रद्धेच्या पताका,
दैवत्वाची झालर,
सोडून द्यायची,
आणि त्याच मातीचा भाग व्हायचं
जिथून आपण आलो होतो.
पुन्हा एकदा तितकंच गोंडस रूप घेऊन येण्यासाठी .
बाप्पा जाताजाता सुद्धा बरंच काही शिकवून जातो .
बरंच काही शिकवून जातो.
गणतीबाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या…
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: स्वाती मंत्री
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




