शोभा जोशी
वाचताना वेचलेले
☆ “नाना…” – कवी : ए. के. मराठे (काव्यानंद) ☆ शोभा जोशी ☆
☆
मोजकंच करावं कार्य
जे दीर्घकाळ टिकावं
जीव ओतून काम करणं
नानाकडून शिकावं ll
*
रंगभूमी आणि पडद्यावरचा
तगडा अंगार हरपला
अचानकच घडलं, खेळ
अर्ध्यावरच करपला ll
*
नट म्हणून मोठा होताच
माणूस म्हणून सुद्धा महान
अनेकानेक शेतकऱ्यांची
भागवलीय त्याने तहान ll
*
फटकळ म्हणता येईल इतका
स्वभावाने होता मोकळा
एकाचवेळी कडक बुंदी
आणि मऊ, नरम ढोकळा ll
*
रक्तामधेच असल्यासारखा
सहज अभिनय करायचा
सगळं व्यापून पुन्हा वर
दोन चार बोटे उरायचा ll
*
किती येतील, किती जातील
नाना कायम राहील स्मरणात
पार्थिव शरीर जळून जातं
कार्य जळत नाही सरणात ll
*
रंगभूमी वा रूपेरी पडद्याची
गोष्ट जेव्हा लिहिली जाईल
दर पाच, दहा पानांवरती
नाना तुझंच नाव राहील ll
☆
कवी : ए. के. मराठे (काव्यानंद)
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


