‘सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
संपादकीय निवेदन
✒️ अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! ✒️
तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे या संस्थेने नवरात्री निमित्त ‘रोज एका देवीवर काव्य‘ अशी काव्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती उज्ज्वला सहस्रबुद्धे यांना तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय संपूर्ण नवरात्रीत काव्य लेखन केल्याबद्दल विशेष सरस्वती मोमेंटो ही प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण यशाबद्दल ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा! 💐
☘️. ☘️. ☘️. ☘️. ☘️
– आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक पुरस्कारप्राप्त कविता – “घटस्थापना…”
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ घटस्थापना… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
(पंचाक्षरी रचना)
*
अश्विन मास,
आरंभ झाला l
घटस्थापना,
दिवस आला ll1ll
*
घटात करू,
धान्याचा पेरा l
सृष्टी सृजन,
निर्मिती फेरा ll2ll
*
नऊ दिवस,
आनंद देई l
देवी चे गाणे,
ललना गाई ll 3ll
*
प्रत्येक दिस,
असे नवीन l
नारीशक्तीचा,
करू सन्मान ll4ll
*
स्त्रियांसाठी तो,
देवीचा सणl
आनंदे भरे,
सारे रांजण ll5ll
*
धनधान्याची,
भरली रास l
सुखे लुटु या,
आनंद खास ll6ll
*
सुगी धान्याची,
शेतात असे l
गृहलक्ष्मी ती,
प्रसन्न दिसे ll7ll
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे




