सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

डॉ. शोभना आगाशे

💐अ भि नं द न 💐

काव्य किरण मंडळ, कल्याण यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. शोभना आगाशे यांच्या ज्ञानेश्वर समाधीया रचनेस द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.

तसेच

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्याकडून मराठी साहित्याच्या अभ्यासासाठी घेण्यात येणा-या साहित्यभूषण या परीक्षेत त्यांनी यश संपादन केले आहे.

त्यांच्या या उज्वल यशाबद्दल ई अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐✒️💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

आजच्या अंकात वाचू या त्यांची ही विशेष कविता – ज्ञानेश्वर समाधी

ज्ञानेश्वर समाधी ☆

 *

भावार्थ दीपिका, लिहविली माये

तीर्थाटना जाये, संतांसवे ||१||

*

परतुनी येता, आज्ञा मागे तदा

जाया मोक्ष पदा, विठाईसी ||२||

*

इंद्रायणी तीरी, वंदूनी गुरूसी

विनवी आज्ञेसी, ज्ञान राजा ||३||

*

समाधीची वार्ता, जाई संतांप्रती

वैष्णवांचे चित्ती, थारा नाही ||४||

*

पंढरीचा रावा, रुक्मिणी सहीत

ऋषी, मुनी, संत, जमा होती ||५||

*

समाधीचे स्थान, सिद्ध ते अनादि

तेथेच समाधी, ज्ञाना घेई ||६||

*

द्वादशी पारणे, रांधे रुक्माबाई

हरी वाढू जाई, प्रसादासी ||७||

*

फुटलासे बांध, निवृत्तीचे मन

करी समाधान, विठूराया ||८||

*

एके बाजू गुरू, दुजे देव तारू

वाद्यांचा गजरू, चोहीकडे ||९||

*

समाधीस्थ होता, निरंजनी लीन

झाले ब्रम्हपूर्ण, ज्ञानराज ||१०||

 डाॅ. शोभना आगाशे

वाकड, पुणे

 मो. नं. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted