सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ बिलोरी ॥ …  लेखक : सुकुल ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

बा. भ. बोरकर यांची एक कविता आहे….

‘समुद्र बिलोरी आयना… सृष्टीला पाचवा म्हैना… ‘

…. यामध्ये बिलोरी हा शब्द येतो. मराठी साहित्यात समुद्र बिलोरी असतो, डोळे बिलोरी असतात. रंग बिलोरी असतात आणि अगदी चांदणेही बिलोरी असते.

…. हे बिलोरी म्हणजे नक्की काय? आजूबाजूच्या शब्दांवरून त्याचा साधारण अर्थ लक्षात येतो ; पण हा शब्द नक्की कोठून आला? विस्तारित शब्दरचनाकारात बिलीर आणि बिलोर अशा दोन शब्दांचे अर्थ दिले आहेत… बिलोर म्हणजे उंंची काच किंवा स्फटिक आणि बिलोरी म्हणजे काचेचे.

मराठी विश्व- कोषात झुंबराविषयीच्या लेखात ” बिलोरी काच” असा उल्लेख आहे. 17 व्या शतकापासून वोदिमियातील झुंबरे लोकप्रिय होती. त्याचे कारण असे की या झुंबरांमध्ये बसवलेले काचेचे लोलक रंग फेकत. लोलकांमध्ये बसवलेले काचेचे मणी स्फटिकाप्रमाणे पैलू पाडलेले असत. त्यावरून चमकदार, प्रकाशमान गोष्टींना बिलोरी म्हणू लागले असावेत.

बोरकरांच्या कवितेचे उदाहरण घ्यायचे, तर सृष्टीत प्रकाश पडल्यानंतर समुद्राचा पृष्ठभाग चकाकतो. हा चकाकणारा पृष्ठभाग म्हणजे ‘ बिलोरी आयना ‘ आहे अशी त्यांनी कल्पना केली. बिलोरी रंग म्हणजे चमकदार रंग आणि चमचम करणारे चांदणे बिलोरी असतेच! बिलवर या दागिन्याचे नावही बिलोरी वरून आले. हे बिलवर चमकदार असतात.

बिलोरी आरसा म्हणताना त्या काचेमागे लावलेल्या पार्‍याची प्रत, आरशांच्या कडांना दिलेले पैलू, आरशावर दिसणारे प्रतिबिंब हे सारे लक्षात येते. बिलोरी आयना हा उत्तम प्रतिचा असणार, अशी खात्री हा शब्द देतो.

.. ‘आम्ही जातो आमच्या गावा’… या चित्रपटात “देहाची तिजोरी” हे गाणे आहे…

‘ स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी… आपलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी… ‘ 

…. या चकाकणार्‍या उत्तम प्रतिच्या आरशामध्ये आपलीच प्रतिमा जशीच्या तशी.. स्पष्ट दिसते हे कवीला सुचवायचे आहे.

लेखक : सुकुल

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted