श्री मंगेश मधुकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “चौथं माकड…” ☆ श्री मंगेश मधुकर

माकड म्हटलं की भिरभिरत्या नजरेन बघणारं, एकाजागी स्थिर नसणारं, दात विचकवणारं, अंगावर धावून येणारं, हातातल्या वस्तू ओढणारं…… हेच चित्र डोळ्यासमोर येतं 

अर्थात फक्त माकडचं नाही तर काही माणसं सुद्धा असचं वागतात यात नवल नाही.. पूर्वजांचे थोडेफार गुण असणारच ना… असो, , ,

आजचा विषय वेगळा आहे.

“ वाईट बोलू नये.. वाईट ऐकू नये.. वाईट पाहू नये “ – – – 

कान, तोंड आणि डोळ्यावर हात ठेवून हा संदेश देणारी माकडं सर्वांना माहिती आहेत. अनेक वर्षे तिघंच होते… 

…. परंतु आता त्यांच्यात ‘चौथा’ आलाय.

काळानुसार जगण्यात नवनवीन गोष्टी येत राहतात. तसंच हे चौथ्याचं येणं.

याची स्पेशालिटी म्हणजे हा कोणता संदेश देत नाही. कायम आपल्याच तंद्रीत, तहान-भूक विसरून 

एका जागी कितीही वेळ बसू शकतो.

…. एकटचं हसणं, तुटक तुटक वागणं, गप्प गप्प राहणं, स्वतःशीच मोठ्यानं बोलणं.

.. दुसरं कोणी बोललं तर उत्तर मिळेल खात्री नाही… सदैव मान खाली, नजर झुकलेली, अजिबात इकडं तिकडं पाहणं नाही. डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. विनाकारण चिडणं, खेकसणं सुरु असतं…. पण सगळं तात्पुरतं… लगेच आपल्या जगात हरवतो.

याच्यापासून त्रास नाही, कारण तो काहीच करत नाही. त्याला शारीरिक कष्ट अजिबात नको असतात.

सगळा कल कामं टाळण्याकडे… एकदम आयतोबा!! सगळं बैठे बिठाये पाहिजे.

मात्र, तो आधुनिक आहे.. स्मार्ट आहे.. टेक्नॉसाव्ही आहे… तरीही सतत अस्वस्थ अन मन सैरभैर, चटकन निर्णय घेणं जमत नाही… ही या चौथ्याची खास वैशिष्ट्य.

.. लोकसंख्येप्रमाणे वाढणारी या चौथ्या माकडांची संख्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय झालाय. याच्यावरून घराघरात वादाचं प्रमाण वाढतयं. नवीन प्रॉब्लेम्स झालेत.

घरात, रस्त्यावर, गर्दीच्या, मोकळ्याच.. या ठिकाणी हे चौथं माकड दिसतं. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं हे धोकादायक बनलंय. प्रचंड संसर्गजन्य असलेल्या याचा वावर सर्वत्र आहे.

सध्यातरी, याच्यावर हमखास उपाय नाही. मात्र त्यासाठी ठरवून प्रयत्न केले पाहिजेत.. ही काळाची गरज.

मला काय करायचं.. माझा काही संबंध नाही.. सगळी दुनिया हेच करतेय

…. असं म्हणून जबाबदारी झटकता येणार नाही….

कारण….

कारण आता.. हे चौथं माकड जगण्याचा भाग झालंय.

त्याला कंट्रोल मध्ये ठेवा नाहीतर…….

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted