सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ “त्या “काहीच” मध्येच सगळं दडलंय…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆
घरी “काहीच करत नाही” अशा स्त्रियांना समर्पित —
जिथे त्या “काहीच” मध्येच सगळं दडलंय…
स्पेनमधील टोरेलाव्हेगा या शहरात एक विलक्षण कांस्य शिल्प उभं आहे — —
एका स्त्रीच्या पाठीवर संपूर्ण घराचं ओझं ठेवलेलं : वॉशिंग मशीन, पोछे, बादल्या, इस्त्रीची पाटी आणि अजून बरेच काही. कलाकार मेर्सिडिज फिमेनिया यांनी घडवलेलं हे सार्वजनिक शिल्प “ला मुझेर डेल डिटर्जेंटे” (दि डिटर्जंट वुमन) नावाने ओळखलं जातं…
… हे जगभरातील महिलांनी रोज करीत असलेल्या — दिसत नाही, पैसे मिळत नाहीत, पण घर चालवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या — तिच्या सर्व कामांना अर्पण केलेलं स्मारक आहे: स्वयंपाक, साफसफाई, मुलांची देखभाल, घरव्यवस्थापन… अनेकदा घरातल्या कोणत्याही व्यक्ती कडून कौतुक किंवा विश्रांतीशिवाय…
… हे शिल्प एक सार्वत्रिक सत्य सांगतं: “घरी काहीच करत नाही” या वाक्याच्या मागे खरं म्हणजे ती सगळंच करते — घर सांभाळण्यापासून ते भावनिक तें कणखर आधार बनण्यापर्यंत…
– – – हे फक्त कला नाही तर जगाला दिलेला संदेश आहे — अदृश्य कामाची किंमत ओळखण्याचा आणि योग्य सन्मान देण्याचा. ती काहीच करत नाही” म्हणणं थांबवूया — आणि “ती सगळं करते” असं म्हणूया.. प्रत्येक आईसाठी…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






