सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ एकांत की एकाकी… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
वाटते कधी कधी मना,
एकांत हवा उपभोगाया!
पण माणूस प्रीय मन माझे,
लागते सहवास शोधाया!
*
एकांत माणसाला,
शांतता प्रीय वाटे!
पण एकाकीपणाची
खंत मनात दाटे!
*
कधी वाटते समाजापासून,
दूर राहावे एकांती!
अन् शांत मनाचे पडसाद
उमटावे अपुल्या भोवती!
*
कधी वाटते सुटून जावे,
गर्दीतून या दूर!
एकट्या मनाला मिळत नाही,
जगण्याचा तो सूर!
☆
© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




छान!!