डॉ. माधुरी जोशी
कवितेचा उत्सव
☆ उजळो सर्वांचे भाग्य… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
☆
मागते फक्त सन्मान
वाहून सर्व जीवन.
घरी दारी ती सतत
कष्टते साहून अपमान
कारण मायेचा धागा
सर्वांसाठी तसाच
मानिते आपुले सारे
ना कधीच पंक्तीप्रपंच
त्या अंतिम श्वासापर्यंत
जर ती असते जुळलेली
मग एकंच दिवस का हा?
गौरव तिच्या भाळी?
सारेच नसती अन्यायी
मग भाग्यवानही काही
सर्वांचे ऊजळो भाग्य
एवढीच विनंती पायी
☆
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



