श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ छोटी गोष्ट… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
मोठ्या प्रवासाचा तो,
छोटाच विसावा होता.
छोट्याच सावलीचा जो,
मोठा दिलासा होता.
*
छोटेच प्रेम होते,
छोटीच गोष्ट होती.
छोट्याच हसण्यामागे,
मोठा खुलासा होता.
*
छोटेच पिंपळाचे जपले,
छोटेच पान होते.
छोट्याच आठवणींचा,
अश्वत्थ मोठा होता.
*
छोट्याच कागदाची जी,
छोटीच नांव होती.
वाहून नष्ट केली तो,
पाऊस मोठा होता.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





छान कविता